मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

यंदा पेरणी उशिरा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस… काय आहे भेडंवड घट मांडणीतील भाकीत?

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अठरा विविध प्रकारचे धान्याचा गोलाकार पद्धतीने मांडणी करण्यात आली. याच्या मधोमध एक खड्डा करून त्यामध्ये घागर ठेवण्यात आली होती. या घागरीवर पुरी, करंजी, पापड यासारखे विविध साहित्य ठेवण्यात आले होते. प्रत्येक साहित्य विविध घटकाचे प्रतीक मानली जातात आणि या मांडलेल्या घटात रात्रभरातून होणाऱ्या बदलांच्या आधारे दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हे संपूर्ण बदलाचे निरीक्षण करून वाघ महाराज पुढील वर्षभरातील पाऊस पाणी, पीक परिस्थिती सोबतच राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाकीत वर्तवत असतात. त्यानुसार वाघ महाराज यांनी भाकीत वर्तवलं आहे.

हे सुद्धा वाचा – Pipe Line Scheme: पाईप लाईन करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान तात्काळ आपला अर्ज करा

काय आहे यंदाचं भाकीत?

अंबाडी कुलदैवत आहे – रोगराई चे प्रमाण आहे

हे वाचलंत का? -  PM Kisan 16th Installment Date | या दिवशी जमा होणार पीएम किसानचा हप्ता, अशी आहे अपडेट - Marathi News | When will the 16th installment of PM Kisan be deposited? An important update has arrived

कपाशी मोघम आहे, फारसी तेजी नसणार.

ज्वारी – सर्वसाधारण येईल, भावात तेजी राहणार.

तूर – मोघम, पीक चांगले येईल.

मूग – मोघम, सर्वसाधारण पीक येईल

उडीद – मोघम, सर्वसाधारण पीक येईल

तीळ – सर्वसाधारण पीक येईल, नासाडी होईल

बाजरी – पीक साधारण येईल, नासाडी होईल.

भादली – कमी अधिक पीक येईल, रोगराई वाढेल

साळी – चांगले येईल पीक, तेजी असणार

मठ – सर्वसाधारण पीक येईल. तेजी असणार

जवस – नासाडी होणार, तेजी राहणार, पीक चांगले येणार

लाख – तेजी राहणार, सर्वसाधारण पीक येईल

वाटाणा – मोघम, सर्वसाधारण पीक येईल

गहू – तेजी राहणार, पीक चांगले राहील

हे वाचलंत का? -  LPG गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी, सिलिंडर दराबाबत केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा…

हरभरा – मोघम, काही ठिकाणी चांगले राहील, रोगाने नुकसान होण्याची शक्यता

करडी – संरक्षण खाते म्हणतात याला, पीक चांगले आहे

घागर

पहिला महिना जून – कमी अधिक पाऊस येणार, पेरणी उशीर होऊ शकते

दुसरा महिना जुलै- पाऊस सर्वसाधारण राहील

तिसरा महिना ऑगस्ट – एकदम चांगला पाऊस येणार, अतिवृष्टीची शक्यता

चौथा महिना सप्टेंबर – पाऊस कमी आहे, पण अवकाळी पाऊस पडणार

Most Read Stories

हे वाचलंत का? -  आता पीकं होणार नाही खराब, असे वाढेल शेतकऱ्याचे उत्पन्न; सरकार मोफत देणार सहा लाख - Marathi News | The state government will provide subsidy so that the fruit crops are not spoiled


Web Title – यंदा पेरणी उशिरा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस… काय आहे भेडंवड घट मांडणीतील भाकीत? – Marathi News | Bhendwal Ghat Mandani Prediction 2023 unseasonal rain continue till september news in marathi

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj