महाराष्ट्र : नंदुरबार (Nandurbar news) जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात जोरदार पाऊस (maharashtra rain update) झाला आहे. धडगाव तालुक्यात २१ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी लावली आहे. आज आलेला पावसामुळे जळगाव तालुक्यातील पिकांना जीवनदान मिळालं. मागील वीस दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे (temprature) नागरिक त्रस्त झाले होते. आज आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उन्हाच्या उकड्यामुळे नागरिकांची सुटका झाली आहे.
पावसाच्या पुन्हा आगमनाने शेतकऱ्यांना दिलासा
गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक नदी व नाले दुधडी भरून चाललेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पूर्णपणे पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आले होते. सध्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. गडचिरोलीतील एट्टापल्ली भामरागड मूलचेरा अहेरी सिरोंचा या तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग केली आहे.
द्राक्ष बागांना पावसा अभावी फटका
द्राक्ष पंढरी म्हणून निफाड तालुक्याची ओळख असून विंचूर येथील द्राक्ष बागांना पावसा अभावी फटका बसताना दिसत आहे. बागेला पाणी मिळत नसल्याने द्राक्ष बागांमधील अन्न रस हा कमी होऊन लागला आहे. कडाक्याचं ऊन पडत असल्याने द्राक्ष बागेचे पाने देखील वाळत असल्याने द्राक्ष उत्पादकांपुढे नवं संकट उभे राहिले असून यामुळे द्राक्षाच्या उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी सांगत आहे.
हे सुद्धा वाचा
202 जनावरांना लंपी त्वचा रोगाची लागण
सातारा जिल्ह्यात जनावरांच्या लंपी त्वचारोगाची आतापर्यंत 202 जनावरे बाधित आहेत. या जनावरांच्या त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत उपायोजना राबवल्या जात आहेत. 128 गाई, 34 बैल आणि 40 वासरे अशात एकूण 202 जनावरांना लंपी त्वचा रोगाची लागण झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर
बुलढाणा जिल्ह्यात मागील वीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरीही पाऊस आला नाही. परिणामी जिल्ह्यातील 7 लाख हेक्टर पेक्षा जास्त पीक धोक्यात आली आहेत. सोयाबीन, कपाशी सुकून गेली आहे. यामुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Web Title – बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बातमी एका क्लिकवर – Marathi News | Maharashtra farmer news agricultural news rain update draout situation