मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

NSD कमांडोचे भविष्य शेतीने बदलले, असे काढतो २५ लाखांचे उत्पन्न – Marathi News | After retirement, the jawan held the hand of the earth

नवी दिल्ली : एनएसडी कमांडोचे नाव ऐकल्यानंतर दहशतवाद्यांना घाम फुटतो. चित्यासारखी झडप मारण्यात हे कमांडो सज्ज असतात. आपण ज्या कमांडोची गोष्ट वाचणार आहोत त्याने आधी दहशतवाद्यांना सडो की पडो करून ठेवलं. आता शेतीची कास धरून लाखो रुपयांचे उत्पन्न काढत आहे. सेवानिवृत्तीनंतर आधुनिक पद्धतीने शेती करून फळबाग लागवड करत आहे. खजूर, पेरू, लिंबू, तरबूज, खरबूजसह अन्य उत्पादने काढत आहे. मुकेश मांजू हे राजस्थानातील पिलानीचे रहिवासी आहेत. पूर्वी मुकेश एनएसजी कमांडो होते.

खजूर शेतीला सरकारी अनुदान

२०१८ मध्ये सेवानिवृत्तीनंतर मुकेश यांनी जैविक पद्धतीने शेती करणे सुरू केले. यातून त्यांचे उत्पादन वाढले. सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांनी वडिलांना मदत करणे सुरू केले होते. आधुनिक पद्धतीने त्यांनी शेतीची सुरुवात केली. त्यांनी आपल्या शेतीत लिंबू, बोर आणि खजूरासह अन्य फळ लावलीत. खजूर शेतीत त्यांना सरकारकडून अनुदानही मिळाले.

उत्पन्न दहापट वाढले

मुकेश मांजू यांनी अॅग्रो टुरिझमही सुरू केलं. लोकं त्यांच्या शेतात येऊन थांबतात. निसर्गाचा आनंद घेतात. मुकेश त्यांना फळ देतो. जाताना पर्यटक फळं आणि भाजीपाला घेऊन जातात. यातून आधीपेक्षा दहापट उत्पन्न वाढले. वर्षाला ते सुमारे २५ लाख रुपयांचे उत्पन्न कमवतात.

हे वाचलंत का? -  जय जवान, जय किसान; सेवानिवृत्तीनंतर धरली शेतीची वाट, दीड लाख रुपये कमावतो महिन्याला - Marathi News | After retirement, the jawan took up agriculture

गायींसह कुकुटपालन

मुकेश यांच्याकडे आता साहीवाल आणि गीरसारख्या देशी गायी आहेत. त्यांच्याकडे दोन घोडे आहेत. काही भागात हे कुकुटपालन करतात. पावसाळ्यात पाणी साठवून ठेवण्यासाठी तलाव बनवला. या तलावात ते मत्स्योत्पोदान करतात. यातूनही त्यांना चांगला नफा मिळतो.

शेतीला कमी लेखून चालत नाही. जमिनीची योग्य निगा राखल्यास शेती आपल्याला भरभरून देते. एका दाण्यापासून हजारो दाणे मिळतात. एवढे रिटर्न कोणत्याही योजनेत नाही. पण, सुशिक्षित लोकं शेतात फारच कमी आहेत. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी अडचणी येत आहेत. शेतकऱ्याला कर्जबाजारी कसं करता येईल, यासाठी हुशार माणसं काम करतात. ते फसवतात. यातून शेतकऱ्याच्या हातात फारसं काही मिळत नाही.

हे वाचलंत का? -  सोशल मीडियातील मेसेजमुळे कांद्याच्या दरात घसरण, केंद्र सरकारच्या धोरणाचाही परिणाम - Marathi News | Onion prices fall due to messages on social media marathi news


Web Title – NSD कमांडोचे भविष्य शेतीने बदलले, असे काढतो २५ लाखांचे उत्पन्न – Marathi News | After retirement, the jawan held the hand of the earth

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj