मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत – Marathi News | Maharashtra farmer news tur Pulses rates incraesed agricultural news in marathi

महाराष्ट्र : कडधान्यातील मुख्य असलेल्या तूर (tur rate hike) या पिकानंतर आता उडीद आणि मूग या शेतमालाचेही दर वाढत आहेत. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दोन्ही कडधान्याचे दर (Pulses rates) सात हजार रुपये प्रती क्विंटलच्यावर गेले आहेत. शेतकऱ्यांकडे हा शेतमाल जास्त प्रमाणात शिल्लक नसून पुढील काळातही आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. तुरीला 10 हजार 200 तर उडीद व मुंगाला 7 हजार 100 प्रतिक्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (farmer news in marathi) आनंद वातावरण आहे. जोपर्यंत शेतमालाची बाजारात आवक वाढत नाही तोपर्यंत दर असेच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पावसाची प्रतिक्षा कायम

परभणी जिल्ह्यात अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर गेल्या 24 तासात परभणीत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. सरासरी 1.2 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्याप ही मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

हे वाचलंत का? -  Farmer News Maharashtra : मिरचीचं पीक वाचवण्यासाठी शेतकरी पाजतोय बाटलीने पाणी - Marathi News | Farmer News Maharashtra agricultural news chilli crop destroyed rain update

धुळे तालुक्यातील शिवारात मक्यावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून लांबलेला पाऊस आणि वातावरणातला मोठा बदल, त्याचा परिणाम आता माथ्यावर झाला आहे. पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट येणार आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून दोन वेळा फवारणी केली आहे. चांगला पाऊस झाला नाही तर अळी नष्ट होणार नाही, त्यामुळे उत्पन्नात घटनेने अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलंत का? -  या राज्यात झेंडूच्या फुलाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार देतंय अनुदान, जाणून घ्या संपूर्ण माहिती - Marathi News | Farmers cultivating marigold flower will get 28 thousand rupees farmer news in marathi

हे सुद्धा वाचा



नंदुरबार जिल्ह्यात काही भागात चांगला पाऊस सुरु झाला आहे. भाजीपाल्याचे आवक वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव चांगलेच कमी झाले आहेत. ठराविक भाजीपाला महाग झाला आहे. सर्वाधिक कमी भाव टमाटे आणि हिरव्या मिरचीचे कमी झाले आहेत. भाजीपाल्याची आवक वाढल्याने शेजारील असलेल्या गुजरात राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर भाजीपाला नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातून जात आहे.

हे वाचलंत का? -  एकाच निर्णयाने मार्केट टाईट, पाकिस्तानी कांद्यासमोर मोठं संकट; 17 अब्जचा कांदा विकणाऱ्या शेजाऱ्याच्या डोळ्यातून टपटप पाणी - Marathi News | Decision to remove minimum export value of Modi Government create tensions to Pakistan Government, the neighbor country has export 17 Billion Onion in the world


Web Title – पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत – Marathi News | Maharashtra farmer news tur Pulses rates incraesed agricultural news in marathi

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj