मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

वांग्याच्या शेतीने शेतकरी झाला लखपती, ३ वर्षांत असे वाढले उत्पन्न – Marathi News | A farmer from Nanded earned three lakh rupees from vegetable crop

नांदेड : लोकांना वाटते की, नगदी पिकांची शेती केल्यास अधिक फायदा होतो. भाजीपाला जास्त ऊन, पाऊस किंवा थंडी सहन करू शकत नाही. उन्हामुळे, पावसामुळे किंवा थंडीमुळे भाजीपाला पिकावर फरक पडतो. परंतु, नियोजन चांगल्या पद्धतीने केल्यास चांगले उत्पादन होते. महाराष्ट्रातील शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळलेत. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्याची टंचाई आहे. अशा परिस्थितीत ठिबक सिंचनाचा वापर वापर केला जातो. त्यातून भाजीपाला पिकांकडे शेतकरी वळले आहेत. आता आपण अशा शेतकऱ्याबद्दल पाहणार आहोत की ज्याने वेगळं यश संपादन केलं. या शेतकऱ्याचं नाव आहे निरंजन सरकुंडे. ते नांदेड येथील रहिवासी आहेत. सरकुंडे हे हदगाव तालुक्यातील जांभाळा गावात पारंपरिक शेती करत होते. परंतु, आता ते वांग्याची शेती करतात. त्यातून त्यांना चांगली कमाई होते. निरंजन सरकुंडे यांनी दीड बिघा शेतीत वांगे लावले. त्यातून त्यांना चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

हे वाचलंत का? -  PM Kisan Scheme | शेतकऱ्यांची होणार दिवाळी! पीएम किसान सन्मान योजनेत होणार हा मोठा बदल - Marathi News | PM Kisan Scheme Big gift to farmers before Diwali Such a big change in PM Kisan Yojana will be beneficial 8000 will be given to farmers

शेजारी गावातील शेतकरी भाजीपाल्यातून करतात कमाई

निरंजन सरकुंडे म्हणाले, त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. आधी ते पारंपरिक शेती करत होते. त्यातून त्यांच्या कुटुंबाचा गाडा कसाबसा सुरू होता. अशात त्यांनी दीड बीघा शेतीत वांग्याची लागवड केली. यामुळे त्यांची चांगली कमाई झाली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ठाकरवाडी गावातही काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली. आता शेतकरी भाजीपाला लागवड करून चांगली कमाई करतात.

ड्रीप एरीगेशनने शेतीला सिंचन

सरकुंडे यांच्या गावात पाण्याची समस्या आहे. त्यामुळे ते ड्रीप एरीगेशनचा वापर करतात. रोप लावल्यानंतर दोन महिन्यांनी वांग्याचे उत्पादन सुरू होते. उमरखेड आणि भोकरच्या आजूबाजूला ते वांगे विकतात. या दीड बिघा जमिनीतून त्यांनी खर्च वजा जाता तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. सुरुवातीला त्यांनी ३० हजार रुपये खर्च केले होते.

हे वाचलंत का? -  Budget 2024 | थेट खात्यात जमा होतील 12000 रुपये, PM Kisan योजनेसाठी काय आहे प्लॅन - Marathi News | Budget 2024 | 12000 rupees will be deposited in the farmer's account under the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana, The Modi government is making big preparations, and it may be announced in the budget


Web Title – वांग्याच्या शेतीने शेतकरी झाला लखपती, ३ वर्षांत असे वाढले उत्पन्न – Marathi News | A farmer from Nanded earned three lakh rupees from vegetable crop

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj