मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Farmer Success Story : सव्वा एकर शेतीत डॉक्टरांचे मन रमले, चांगले आलेल्या पिकामुळे लाखो रुपये मिळाले – Marathi News | Farmer Success Story tomato cultivation doctor kapil katte latur

लातूर : लातूर (latur) जिल्ह्यातील एका डॉक्टरांनी चांगली शेती (Farmer Success Story) केली असल्यामुळे त्यांचं जिल्ह्यात सगळीकडं कौतुक केलं जात आहे. त्यांनी घेतलेल्या पीकातून १४ लाख रुपयांचा फायदा झाला आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. त्यापैकी त्यांनी सव्वा एकरात टोमॅटोची लागवड (tomato cultivation) केली होती. पीक जोमात आले आणि टोमॅटोला चांगला भाव मिळाल्यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला आहे. त्या डॉक्टरांचं नाव कपिल कत्ते (kapil katte) असं आहे. ते तरुण असून त्यांनी यापुढे सुध्दा शेतीत अशा पध्दतीचे प्रयोग करणार असल्याचे सांगितले आहे.

हे वाचलंत का? -  PM Kisan: पंतप्रधान कार्यालयासमोर ठेवला प्रस्ताव, पीएम किसान सन्मान निधीमध्ये होणार मोठी वाढ ? - Marathi News | PM Kisan Samman Nidhi news in marathi maharashtra farmer news kisan scheme

लातूर जिल्ह्यातल्या करडखेल परिसरात डॉक्टरांची शेती आहेत. त्यांनी बीएएमएस ही पदवी घेतली आहे. ते आपली घरची शेती संभाळत हॉस्पिटल सुध्दा चालवतात. त्यांनी मे महिन्यात टोमॅटोची लागवड शेतात केली होती. त्या पिकाची चांगली काळजी घेतल्यामुळे टोमॅटो चांगले लागले होते. त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं आहे.

कपिल हत्ते हे परभणी जिल्ह्यात आपलं रुग्णालय चालवतात . हा व्यवसाय सांभाळून डॉक्टरांनी त्यांच्या मुळगावी उदगीर तालुक्यातल्या करडखेल इथं आपल्या वडिलोपार्जित शेती शेती चांगलीचं फुलवली आहे, त्यामुळे त्यांचं सगळीकडं कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा



हे वाचलंत का? -  पाऊस कमी झाल्यामु्ळे शेतातली पीके करपली, शेतकऱ्यांची व्यथा सरकार दरबारी - Marathi News | Kharip season crop destroyed inregular rain in maharashtra

आतापर्यंत टोमॅटोची सहावेळा तोडणी कऱण्यात आली आहे. अजून एक तोडणी होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांना केलेल्या शेतीतून १४ लाख रुपयांचा फायदा झाला आहे. बाजारपेठेचा अंदाज घेऊन डॉक्टरांनी ही लागवड केली होती. त्याचा त्यांना फायदा झाला आहे. शेतीतून चांगला फायदा मिळाल्यामुळे तरुणांनी शेतीत विविध प्रयोग करावे असं त्यांनी सांगितलं आहे.


Web Title – Farmer Success Story : सव्वा एकर शेतीत डॉक्टरांचे मन रमले, चांगले आलेल्या पिकामुळे लाखो रुपये मिळाले – Marathi News | Farmer Success Story tomato cultivation doctor kapil katte latur

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj