मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

टॉमॅटोनंतर डाळिंबाला भाव, काजू-बदामला टक्कर, १ तोळा सोन्याच्या भावात फक्त एवढेच डाळिंब मिळणार – Marathi News | The price of pomegranates has increased, the price of 1 kg of pomegranate is Rs. 800 per kg

अहमदनगर | आत्तापर्यंत डाळिंबाला प्रतिकिलो मागील १५ दिवसात मिळालेला हा सर्वात जास्त दर असल्याचा दावा शेतकरी आणि व्यापाऱ्याने केला आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील युवा शेतकरी रमेश गाडेकर यांनी आपल्या शेतात विविध प्रकारच्या डाळिंबाची बाग फुलवली आहे. रमेश गाडेकर बुधवारी आपली डाळिंब राहाता बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन आले. पण त्यांना अपेक्षेपेक्षाही जास्त भाव मिळाला. इतर डाळिंबाला सरासरी, तर भगवा व्हरायटिला हमाली, तोलाई आणि इतर खर्च वजा करता प्रतिकिलो ८०० रुपयांचा दर मिळाला आहे. या व्हरायटीच्या 26 किलो डाळिंबाला 16 हजार रुपये मिळाल्याने शेतकऱ्याने आनंद व्यक्त केला आहे. राहाता बाजार समितीत शेतकऱ्याच्या डाळिंबाला उच्चांकी ८०० रुपये प्रति किलो दर सध्या मिळतोय.

हे वाचलंत का? -  Farmer News : संतापलेल्या शेतकऱ्याने दीड एकर मूग पिकावर फिरवला ट्रॅक्टर, कारण सांगितल्यानंतर... - Marathi News | Kharif season affected by changing climate

१५ दिवसांत ७ पट भाव वाढला

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील जांभूळ गावातील अण्णा पाटील जांभूळ यांना १५ दिवसांपूर्वी १७० रुपये किलो भाव मिळाला होता, पण हा भाव बांगलादेशला पाठवलेल्या डाळिंबाला मिळाला होता. अण्णा पाटील यांच्या डाळिंबाच्या १५०० झाडावर जवळपास 40 ते 50 टन डाळिंबाचे उत्पन्न घेतले आहे. या डाळिंबाची १३ सप्टेंबर २०२३ रोजी 170 रुपये विक्री करण्यात आलेली आहे. तर हा डाळिंब सध्या बांगलादेशी पाठवण्यात आला होता, इतर १५०० झाडाच्या डाळिंबातून जवळपास एक कोटीच्या वरती उत्पन्न मिळणार, अशी शक्यता जांभुळ गावचे शेतकरी अण्णा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलंत का? -  dasara 2023 | झेंडूच्या फुलांनी आणले शेतकऱ्यांसमोर संकट...काय आहेत दर - Marathi News | Marigold flower price Fall, Farmers in trouble marathi news

3 हजार झाडाच्या देखभालीसाठी वर्षभरात साडेचार लाख रुपये खर्च करून बाग सांभाळली, उत्तम नियोजन करून देखभाल करून कमी फवारणीत कमी खर्चात या बागेचे देखभाल केल्याने उत्पन्नही चांगले मिळाल्याची भावना अण्णा पाटील यांनी व्यक्त केली.

उष्णतेपासून डाळिंब बागा अशा वाचवल्या

मागील तीन महिन्यांपासून पाऊस नसल्याने सोलापूर जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढले होते. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला डाळिंबाची सर्वात जास्त काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागली. वाढत्या उष्णतेपासून डाळिंब बागा वाचविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू झाली. सांगोला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबावर कापडी अच्छादन टाकून डाळिंब बागांचे संरक्षण केले.

हे वाचलंत का? -  NSD कमांडोचे भविष्य शेतीने बदलले, असे काढतो २५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | After retirement, the jawan held the hand of the earth

पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यातच उष्णतेचे प्रमाण अधिक वाढले. वाढत्या तापमानामुळे डाळिंब फळांवर काळे डाग येण्याचा धोका वाढला. शिवाय झाडांवर मर रोग येण्याची शक्यता ही बळावली. उष्णतेमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून डाळिंब बागांचा बचाव करण्यासाठी शेतकर्यांनी ही शक्कल लढवली होती.


Web Title – टॉमॅटोनंतर डाळिंबाला भाव, काजू-बदामला टक्कर, १ तोळा सोन्याच्या भावात फक्त एवढेच डाळिंब मिळणार – Marathi News | The price of pomegranates has increased, the price of 1 kg of pomegranate is Rs. 800 per kg

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj