मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

दिवाळीच्या तोंडावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पहिला टप्प्यात इतक्या शेतकऱ्यांना तब्बल इतक्या कोटीच्या पिकविम्याचा लाभ – Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde has announced to provide crop insurance to farmers before Diwali

मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : राज्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळीच्या तोंडावर आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील पिक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पिकविमा अग्रीम वितरण करण्यास मंजूरी दिली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना होणार आहे. या विम्याचे पैसे संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यासाठी विमा कंपन्यांनी सुरुवात केल्याने बहुतांश जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.

राज्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे हवामानातील बदलामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयांत पिकविमा योजनेत राज्यातील 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांचा सहभाग घेतला होता. अंतरिम नुकसान भरपाई ( MSA ) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने या पिकविमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करुन 25 टक्के अग्रीम पिकविमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते, त्यावरुन बहुतांश कंपन्यांनी विभागीय आणि राज्य स्तरावर अपिल केले होते. या अपिलांच्या सुनावण्या जसजशा होत आहेत. त्याप्रमाणे आतापर्यंत विमाकंपन्यांनी एकूण 1700 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले आहे. अपिलाची सुनावणी जसजसी पूर्ण होतील तसतशी शेतकरी लाभार्थी संख्या आणि अग्रीम रक्कम यात मोठी वाढ होणार आहे.

हे वाचलंत का? -  अवकाळी पावसाने शेतीतील उभे पीक आडवे…निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांचे आश्रू पुसणार कोण?

1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांचा सहभाग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रमुख पिकविमा कंपन्यांची धनंजय मुंडे यांनी बैठक घेतली होती. याबाबत अग्रीमचा तिढा तातडीने सोडविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील पिक विम्याबाबत सातत्याने सूचना दिल्या होत्या. या सर्वांचेच धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत. तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी सोपस्कार तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना केल्या आहेत. खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.

हे वाचलंत का? -  या रानभाज्या तुम्ही खाल्ल्यात का, महत्त्व जाणून व्हालं थक्क! - Marathi News | Akola NEWS Organized by Atma Ranbhajya Mahotsav

कोणत्या जिल्ह्यात किती पीकविमा मंजूर?

नाशिक – शेतकरी लाभार्थी – 3 लाख 50 हजार (रक्कम – 155.74 कोटी)

जळगाव – 16,921 (रक्कम – 4 कोटी 88 लाख)

अहमदनगर – 2,31,831 (रक्कम – 160 कोटी 28 लाख)

सोलापूर – 1,82,534 (रक्कम – 111 कोटी 41 लाख)

सातारा – 40,406 (रक्कम – 6 कोटी 74 लाख)

सांगली – 98,372 (रक्कम – 22 कोटी 4 लाख)

बीड – 7,70,574 (रक्कम – 241 कोटी 21 लाख)

बुलडाणा – 36,358 (रक्कम – 18 कोटी 39 लाख)

धाराशिव – 4,98,720 (रक्कम – 218 कोटी 85 लाख)

हे वाचलंत का? -  PM Kisan | या दिवशी खात्यात येईल पीएम किसान योजनेचा पैसा, ही आहे अपडेट - Marathi News | Farmers will soon have Lakshmi Darshan, and the installment of the Farmers Samman Nidhi Yojana will be deposited at this time PM Kisan Scheme

अकोला – 1,77,253 (रक्कम – 97 कोटी 29 लाख)

कोल्हापूर – 228 (रक्कम – 13 लाख)

जालना – 3,70,625 (रक्कम – 160 कोटी 48 लाख)

परभणी – 4,41,970 (रक्कम – 206 कोटी 11 लाख)

नागपूर – 63,422 (रक्कम – 52 कोटी 21 लाख)

लातूर – 2,19,535 (रक्कम – 244 कोटी 87 लाख)

अमरावती – 10,265 (रक्कम – 8 लाख)

एकूण – लाभार्थी शेतकरी संख्या – 35,08,303 (मंजूर रक्कम – 1700 कोटी 73 लाख)


Web Title – दिवाळीच्या तोंडावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पहिला टप्प्यात इतक्या शेतकऱ्यांना तब्बल इतक्या कोटीच्या पिकविम्याचा लाभ – Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde has announced to provide crop insurance to farmers before Diwali

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj