नवी दिल्ली | 9 February 2024 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना देशभरात लोकप्रिय ठरली आहे. शेतकऱ्यांना या योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. योजनेतंर्गत किसान क्रेडिट कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकरी या मदत निधी कुठे खर्च करतात. त्याचा कसा वापर करतात हे समोर येणार आहे. दरम्यान अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे. काही कारणांमुळे या योजनेचा लाभ थांबविण्यात आला आहे. अशा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून, अडचण सोडविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय या खास मोहिम राबविणार आहे. येत्या 12 फेब्रुवारीपासून ही खास मोहिम राबविण्यात येणार आहे.
15 हप्ते झाले जमा
गेल्यावर्षी या योजनेचा ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. या 27 जुलै रोजी 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. म्हणजे प्रत्येक हप्त्यात जवळपास पाच महिन्यांचे अंतर आहे. आता 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये जमा केले. DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली.
हे सुद्धा वाचा
16 व्या हप्त्याची प्रतिक्षा
पीएम किसान योजनेतंर्गत 15 हप्ता जमा करण्यात आला आहे. आता या योजनेचा 16 हप्ता लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या योजनेतंर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान ही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
एक आठवड्याचे अभियान
कृषी मंत्रालयानुसार, 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल. देशभरातील 4 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे.
हप्ता बंद होण्याचे कारण काय
- शेतकऱ्यांचा हप्ता बंद होण्याची दोन महत्वाची कारणे आहेत
- पहिले कारण e-kyc संबंधीचे आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन घ्या
- बँक खाते आधार कार्डशी लिंक न केल्याने हप्ता बंद झाला असेल
- 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान अभियान सुरु असेल
- सेवा केंद्रावर हे अभियान चालविण्यात येईल, त्याठिकाणी समस्या सोडविण्यात येईल
- जिल्हा प्रशासन याविषयीची माहिती देणार आहे
- समस्या दूर झाल्यास शेतकऱ्यांना थांबलेल्या हप्त्याची रक्कम पण मिळेल
Web Title – PM Kisan | पीएम किसानचा हप्ता झाला बंद? मग आता घरबसल्या होईल समाधान – Marathi News | PM Kisan | Installment of PM Kisan Samman Nidhi stopped? Don’t worry, the Agriculture Ministry Will organize camps village level here