मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, यंदा धो-धो पाऊस कोसळणार, सामान्य पावसाचा सलग दुसरा अंदाज – Marathi News | Monsoon 2024 Normal rainfall in India this year, Skymet forecast marathi news

मागील वर्षी देशातील अनेक भागांत सामान्य पेक्षा कमी पाऊस झाला होता. या कमी पावसाचा परिणामामुळे अनेक भागांत दुष्काळ निर्माण झाला होता. खरीप पिकानंतर रब्बी पिकांवर पावसाचा परिणाम झाला होता. आता यंदा मात्र सामान्य पाऊस होणार आहे. आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या (अपेक) या संस्थेने काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजानंतर स्कायमेटचा अंदाज आला आहे. देशभरात यंदाचा मान्सून सामान्य असणार असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. यापूर्वी 12 जानवेरी 2024 रोजी स्कायमेटने सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला होता.

‌‘ला-निना’ची परिस्थिती

मागील वर्षी पावसावर ‌‘एल-निनो’चा परिणाम होता. परंतु आता प्रशांत महासागरातील ‌‘एल-निनो’ची परिस्थिती निवळली आहे. आता ‌‘ला-निना’ची परिस्थिती निर्माण होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. ला-निनाची परिस्थिती असल्यास पाऊस चांगला होतो. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या (अपेक) हवामान केंद्राने वर्तविला आहे.

हे वाचलंत का? -  अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ₹6000 जमा.. बघा लाभार्थी यादी…

स्कायमेटचा अंदाज सामान्य पाऊस

देशभरात यंदाचा मान्सून सामान्य असणार आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेचा हा दुसरा अंदाज आहे. त्यात स्कायमेटने म्हटले आहे की, सुरुवातीला मान्सूनचा प्रभाव कमी असणार आहे. परंतु एकंदरीत जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मान्सून असणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत दक्षिण भारतासह मध्य भारतात मान्सून जास्त प्रभावी राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

स्काईमेटचे मुख्य निर्देशक जतिन सिंह यांनी सांगितले की, ”एल-निनोचे रुपांतर आता ला-निनामध्ये होत आहे. यामुळे पाऊस सामान्य होईल. दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागांत चांगला पाऊस असणार आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेशात जोरदार पाऊस असणार आहे. बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागांत जुले ते ऑगस्ट दरम्यान कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.”

हे वाचलंत का? -  इंदापूरमध्ये लाईट शिवाय मोटार चालते, शेतकऱ्यांचा जुगाड पाहायला लोकांची गर्दी - Marathi News | Pune indapur farmer jugaad video viral on social media agricultural news in marathi

चार महिन्यांत कशी आहे शक्यता

जून

  • 50% सामान्य पावसाची शक्यता
  • 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता
  • 30% सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता

जुलै

  • 60% सामान्य पावसाची शक्यता
  • 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता
  • 20% सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता

ऑगस्ट

  • 50% सामान्य पावसाची शक्यता
  • 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता
  • 30% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता

सप्टेंबर

  • 60% सामान्य पावसाची शक्यता
  • 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता
  • 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता


Web Title – शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, यंदा धो-धो पाऊस कोसळणार, सामान्य पावसाचा सलग दुसरा अंदाज – Marathi News | Monsoon 2024 Normal rainfall in India this year, Skymet forecast marathi news

हे वाचलंत का? -  इंझोरी येथील शेतकरी दाम्पत्याचा सन्मान, अजय आणि पूजा ढोक यांना मानाचे कृषी पुरस्कार - Marathi News | Farmer couple Ajay and Pooja Dhok of Inzori villege announced maharashtra agriculture award

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj