मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

डॉग स्कॉड, CCTV… आंब्याला व्हीव्हीआयपीसारखी सुरक्षा, कारण काय? – Marathi News | Jabalpur farmers mangoes rate 2 lakh 50 thousand for one kg marathi news

संकल्प सिंह परिहार यांची आंबे बाग

उन्हाळा सुरु झाला म्हणजे तमाम लोकांना आंब्याचे वेध लागतात. फळांचा हा राजाची वाट लहानापासून वृद्धापर्यंत सर्वच जण पाहतात. कोकणातील हापूस आंबा देशातच नाही विदेशात पोहचला आहे. खवय्यांना हापूसची गोडी नेहमीच मोहून घेते. परंतु आता तुम्हाला एक आंब्याच्या बागेसंदर्भात माहिती देणार आहोत. या आंब्याच्या सुरक्षेसाठी ११ विदेशी कुत्रे आहेत. ते २४ तास आंब्याची देखरेख करतात. त्यांचे कर्मचारी आहेत. आंबे असलेल्या आमराईला मोठे कुंपण लावले आहेत. तसेच ८ सीसीटीव्ही कॅमेरे आंब्यासाठी लावले आहेत.

व्हीव्हीआयपी सुरक्षा का?

आता तुम्ही विचार करत असला एखाद्या व्हीव्हीआयपी सारखी सुरक्षा आंब्याला का आहे. कारण ‘मियाजाकी’ नाव असलेल्या हा आंबा मौल्यवान आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अडीच लाख रुपये प्रतिकिलो आहे. या आंब्याची शेती विदेशातच केली जात होती. आता भारतात होत आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील शेतकरी संकल्प सिंह परिहार यांच्या शेतात आंब्यासाठी ही सुरक्षा आहे. या ठिकाणी विविध २४ जातीचे आंबे आहेत. ‘मियाजाकी’ आंबा आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिकिलोला अडीच लाख रुपयांना विकला जात आहे.

हे वाचलंत का? -  पिएम किसान योजना 18 व्या हप्त्याच्या नव्या लाभार्थींची यादी जाहीर, जाणून घ्या तुमचं नाव आहे का?

नर्मदा किनारी शेती

शेतकरी संकल्प सिंह परिहार यांच्या शेतात ‘मियाजाकी’ आंब्यासोबत मल्लिका, आम्रपाली, काळा आंबा, चौसा, सफेदा बॉम्बेग्रीन, टाईयो नो, टमँगो, मियाजाकी, ब्लॅक मँगो, जम्बो ग्रीन, जॅपनीज, ड्रॅगन, यूएसए सक्सेसन, गुलाब केशर, हुस्नेआरा, हल्दीघाटी, गुलाब खासयासह २४ जातींचे आंबे आहेत. संकल्प यांच्या बागेतील संपूर्ण आंबा त्यांच्या बागेतूनच विकले जातात. त्यांना बाजारात जाण्याची गरज पडत नाही. जबलपूरमध्ये नर्मदा नदीच्या किनारी त्यांची शेती आहे. या शेतीत ते आधुनिक पद्धतीने शेती करतात.

हे सुद्धा वाचा

पहिला आंबा भगवान महाकालसाठी

संकल्प सिंह परिहार म्हणतात, “आमच्या बागेतील प्रत्येक प्रकारच्या आंब्याचे पहिले फळ सर्वप्रथम भगवान महाकाल (उज्जैन येथील ज्योतिर्लिंगों) अर्पण करण्यासाठी जातो. त्यानंतर आम्ही आंब्याची बाजारात विक्री करतो.” संकल्प यांची आंब्याची बाग जबलपूर शहरापासून जवळ आहे. या बागेत स्वादिष्ट गोड आंबे पिकतात, हे अनेकांना माहीत आहे, त्यामुळे आंबे चोरण्याचा अनेकदा प्रयत्न होतो. त्यामुळे एखाद्या खजिन्याप्रमाणे बागेचे रक्षण केले जाते.

हे वाचलंत का? -  राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा देखील अंदाज - Marathi News | Unseasonal rain in Maharashtra, temperature in the state will rise above 40 degrees marathi news


Web Title – डॉग स्कॉड, CCTV… आंब्याला व्हीव्हीआयपीसारखी सुरक्षा, कारण काय? – Marathi News | Jabalpur farmers mangoes rate 2 lakh 50 thousand for one kg marathi news

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj