मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

शेतकऱ्यांनो, तब्बल इतक्या कोटींची नुकसाभरपाई जाहीर.., पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती..

Crop Insurance: जिल्ह्यातील 5 लाख 86 हजार शेतकऱ्यांना एक रुपयाच्या पीक विमा योजनेंतर्गत 853 कोटी रुपयांची भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे. येत्या दोन आठवड्यात शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून ही मदत मिळेल, पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रकारची ग्वाही दिली आहे. पालकमंत्री भुसे जिल्हाधिकारी कार्यालयामधील नियोजन भवनामधे झालेल्या समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

यंदा नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची मागणी होत असतानाच, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरिपातील पीक नुकसानीची टक्केवारी पीक कापणीच्या प्रयोगानंतर समोर आली होती. यामध्ये मका, सोयाबीन, मूग, उडीद, तांदूळ, बाजरी, कापूस, भुईमूग आणि ज्वारीच्या उत्पादनात सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेमधे 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचा अहवाल या थेट केंद्र सरकारच्या टीमनेच दिला.

शेतकऱ्यांनो मोठी बातमी! पीएम किसान योजनेच्या हप्त्यात तब्बल इतक्या रुपयांची वाढ..

हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांनो, असे तपासा कापूस व सोयाबीन अनुदान यादीतील तुमचे नाव! जाणून घ्या सोपी पद्धत..

याची पाहणी कृषी व पीक विमा (Crop Insurance) संस्थेच्या प्रतिनिधींनीही केली. असे असताना सलग 21 दिवस जिल्ह्यातील 55 महसूल मंडळात पाऊस पडला नाही. त्यामुळे नांदगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यानंतर येवला, मालेगाव, बागलाण, चांदवड, सिन्नर या तालुक्यांचाही यामधे समावेश आहे.

सप्टेंबरपासून प्रतीक्षा आहे

नाशिक तालुक्यामधील मखमलाबाद व सातपूर येथील मंडळाच्या उडीद उत्पादनात 100 टक्के घट झाली असून रायपूर मंडळ (ता. चांदवड) येथे सोयाबीन आणि बाजरी, तर दुगाव मंडळामधील मका, उमराणे मंडळ येथील (ता. देवळा) मूग या पिकाच्या उत्पादनात 100 टक्के घट झाली आहे. करंजगव्हाण (मालेगाव) विभागात बाजरी उत्पादनात 123.21 टक्के घट झाली असल्याचं बघायला मिळालं.

हे वाचलंत का? -  Agri Loan : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; आता इतक्या लाखांच्या कृषी कर्जावर मिळवा व्याज सवलत, अपडेट तरी काय

अखेर, या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळाली.. जिल्ह्यांच्या याद्या पहा..

हे वाचलंत का? -  बी-बियाणे चढ्याभावाने विकल्यास जागच्या जागी कारवाई करा, कृषिमंत्री धनजंय मुंडे यांचे अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde warns of immediate action if seeds are sold at high prices

त्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी 1 सप्टेंबर 2023 रोजी प्रतिनिधींच्या बैठकीत महिनाभरात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला, विमा भरपाईच्या (Crop Insurance) रकमेच्या 25 टक्के रक्कम विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते. कंपनीने यानंतर 79 कोटी रुपये दिले होते, मात्र पिक कापणीच्या प्रयोगानंतर पात्र ठरलेल्या 5 लाख 86 हजार शेतकऱ्यांना कंपनीने सुमारे 853 कोटी रुपये अजूनही दिलेले नाहीत.


Web Title – शेतकऱ्यांनो, तब्बल इतक्या कोटींची नुकसाभरपाई जाहीर.., पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती..

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj