Today weather forecast: मुसळधार ते अति मुसळधार पाऊस हा मध्य महाराष्ट्रामधील जिल्ह्यांतील घाटक्षेत्रात तुरळक ठिकाणी कोसळण्याची शक्यता आहे. यासोबतच सोलापूर आणि सांगली वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्रामधे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळ, जोरदार वारा (तास 40-50 किमी) आणि वीज कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच मराठवाड्यातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी केला असल्याचं दिसून येत आहे. Today weather forecast
मुसळधार ते अति मुसळधार पाऊस हा कोकण जिल्ह्यांमधील काही तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची (monsoon update)शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
काय सांगता? सोयाबीन बाजारभाव तब्बल एवढ्या रुपयांनी वाढला.. बघा आजचा बाजार भाव..
ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत आणि विदर्भामधील वर्धा, यवतमाळ, आणि अमरावती जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भामधे तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यामधे ऑरेंज अलर्ट (orange alet) जारी करण्यात आला आहे, तर बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (yellow alert) जारी करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी मुसळधार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येथे वाचा – बाप रे! सोयाबीन पिकावर या रोगाचा हल्ला; असा करा बंदोबस्त..!
Web Title – शेतकऱ्यांनो सावधान! या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा.. पिकांचे मोठे नुकसान..