मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

शेतकऱ्याने भंगारातून बनवला 55 फूटाचा बूम स्प्रे, 20 मिनिटात करतो दहा एकरात फवारणी – Marathi News | Nandurbar farmer builds 55 foot boom spray from scrap

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील 33 वर्षीय युवक कमलेश अशोक चौधरी हा खाजगी कंपनीत काम करीत असतात वडिलांच्या आजारामुळे नोकरी सोडून 5 वर्षापूर्वी गावाकडे परतला. वडिलांच्या निधनानंतर त्यांची दहा एकर शेती तो करू लागला. कमलेश चौधरी चे शिक्षण कृषी पदवीधर पर्यंत झाले आहे. गावाबाहेर वैजाली रस्त्यावरील एका गोडाऊनमध्ये सर्व टाकाऊ वस्तू त्यानी संग्रह करून ठेवलेला आहे. दरवर्षी ते  युट्युबवर पाहून नवीन नवीन शेती अवजाराचा शोध लावत असतात आणि टाकाऊ पासून ते टिकाऊ तयार करण्याची त्यांना आवड आहे. गेल्यावर्षी कमलेशने २७ फूट लांबीचा बूम स्प्रे मॅन्युअली तयार केला होता. त्यातून त्याने १८५० एकरावर औषध फवारणी केली. यावर्षी चक्क हायड्रोलिक तोही ५५ फूट लांबीचा स्प्रे पंप तयार केला आहे. कमलेशने दोन महिन्यांत हा हायड्रोलिक बूम स्प्रे मशीन तयार केला आहे. हे मशिन वीस ते पंचवीस मिनिटांत दहा एकरची कीटकनाशक, तणनाशकाची फवारणी करते. कमलेशची ही कामगिरी पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत.

कमलेश याने मशीनसाठी जुने ट्रॅक्टर साडेतीन लाखाला खरेदी केले होते, त्यासाठी पंजाब येथुन एक लाख 75 हजाराचे इजराइल बनावटीचे बुस्टनचे एअरलेस टायर मागवले. मागील दोन टायर सहा फूट उंचीचे तर पुढील दोन टायर साडे चार फूट उंचीचे आहेत. त्याला एक हजार लिटरची टाकी बसवली ज्याला खर्च ४५ हजार रुपये आला, ही टाकी ट्रॅक्टरच्या मधोमध बसविली आहे. त्यामुळे तोल साधला जाऊन टॅक्टर पुढून उचलले जाऊ नये याची काळजी घेतली गेली. टाकीतील औषधी फवारणीसाठी स्पीड पंप बसवला आहे. जो एका मिनिटाला 185 लिटर पाण्याच्या प्रेशर करतो. कीटकनाशक फवारणी करताना चालकाच्या अंगावर केमिकल येऊ नये म्हणून काचेची केबिन बनवली असून त्यात पंखा देखील बसवला आहे.हे सर्व मशिन कमलेश याने दोन महिन्यात तयार केले आहे.

हे वाचलंत का? -  यंदा पेरणी उशिरा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस... काय आहे भेडंवड घट मांडणीतील भाकीत?

वेळची आणि पैशाची  बचत

या मशीनचा फायदा असा आहे की, 55 फूट बूम स्प्रे केला जातो. दहा एकरला फक्त वीस ते पंचवीस मिनिटात फवारणी होते. या मशीनमुळे फवारणी करताना मजूर वर्गाला साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका पोहचत नाही. तसेच फवारणी करताना समप्रमाणात फवारणी केली जाते. या मशीनमुळे जादा मनुष्यबळ लागत नाही. वेळची आणि पैशाची देखील बचत होते असे कमलेश याने म्हटले आहे.

हे वाचलंत का? -  आता मजल्यानुसार सिडकोच्या घरांच्या किमती; तब्बल 26 हजार घरांची योजना, पहा मजल्यानुसार किंमती..!

हे वाचलंत का? -  लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्राचा कांदा उत्पादकांना दिलासा, सहा देशांत कांदा निर्यातीस परवानगी - Marathi News | Centre Government allows export of 99,150 MT onion to six countries marathi news


Web Title – शेतकऱ्याने भंगारातून बनवला 55 फूटाचा बूम स्प्रे, 20 मिनिटात करतो दहा एकरात फवारणी – Marathi News | Nandurbar farmer builds 55 foot boom spray from scrap

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj