मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, ‘या’ योजनेसाठी 35 हजार कोटी मंजूर; जाणून घ्या योजनेचं नाव – Marathi News | Prime Minister’s PM ASHA scheme for farmers, 35 thousand crores approved

नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने PM-AASHA या योजनेसाठी 35,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांवर उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यासाठी देखील महत्वाचा निर्णय घेतला आहे.सरकारने जाहीर केले की पीएम-आशा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या मिळकतीत वाढ होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाने डाळ आणि तिळाच्या शेती पिकांना किमान मूल्य मिळणार आहे.भारतात या प्रकारच्या पिकांमध्ये आत्मनिर्भर होणार आहे. त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

पीएम-आशा म्हणजे काय?

PM-ASHA ही एकात्मिक योजना आहे. शेतकरी आणि ग्राहकांच्या सेवेसाठी केंद्र सरकारने किंमत समर्थन योजना (PSS) आणि किंमत स्थिरीकरण निधी (PSF) योजना PM आशा योजनेमध्ये विलीन केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला किमान हमी भाव मिळण्यास मदत होईलच, शिवाय ग्राहकांचीही सोय होणार आहे.

हे वाचलंत का? -  PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा मिळेल लाभ, लवकर करा हे काम - Marathi News | PM Kisan Samman Nidhi Yojana If you want the 15th installment of PM Kisan Yojana, then do it quickly, the process is easy

कॅबिनेटचे अन्य निर्णय

आज कॅबिनेटच्या बैठकीत मीडिया आणि मनोरंजन जगतातील महत्वाचे निर्णय घेतले. अॅनिमेशन, व्हीज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटीसाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापित करण्यास मंजूरी मिळाली आहे. क्रिएटर्सच्या इको-सिस्टमला त्यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.तसेच रोजगारांच्या नव्या संधी मिळणार आहेत. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत ‘बायो-राइड’ योजनेला मंजूरी दिली आहे. या निर्णयाने जैवतंत्रज्ञानात भारताची प्रगती होणार आहे. यामुळे सातत्याने विकास, आर्थिक पोषण आणि क्षमतेत वाढ करण्यावर जोर देण्यात येणार आहे.

हे वाचलंत का? -  स्ट्राबेरी शेतीतून दीड कोटी रुपये कमावले, असा होतो फायदा - Marathi News | A farmer became a millionaire from strawberry cultivation


Web Title – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, ‘या’ योजनेसाठी 35 हजार कोटी मंजूर; जाणून घ्या योजनेचं नाव – Marathi News | Prime Minister’s PM ASHA scheme for farmers, 35 thousand crores approved

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj