Agriculture Loan : केंद्र सरकार शेतकर्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी अनेक योजना चालवत आहे. ज्यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. जर शेतकर्यांकडे शेती करण्यासाठी पैसे नसतील तर या सरकारी योजनांचा (Government Schemes) लाभ घेऊन शेतकरी शेती करू शकतो. शेतकर्यांना वेळेवर पैशांची मदत व्हावी म्हणून शेतकर्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) दिले जाते. या कार्डच्या मदतीने शेतकर्यांना खूपच स्वस्तात लोन मिळते. या किसान क्रेडिट कार्डचा लाभ शेतकर्यांसोबत पशुपालक आणि मच्छिमार सुद्धा घेऊ शकतात. या कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत येथे जाणून घेऊया..
4 टक्के सवलतीच्या व्याजदराने लोन मिळेल (Agriculture Loan)
आपल्या माहिती सांगू इच्छितो की चालू आर्थिक वर्षासाठी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतीसाठी घेतलेल्या 3 लाख रुपयांच्या लोनसाठी व्याज सहायता योजना सुरू ठेवण्याची मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतून शेतकर्यांना फक्त 4 टक्के सवलतीच्या व्याजदराने लोन मिळत आहे.
किसान क्रेडिट कार्डचे महत्वाचे नियम
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून लोन घेणार्या शेतकर्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील सदस्याला उरलेलं लोन भरावं लागेल. तसेच हे लोन दोन पद्धतीचे असतात. एक सुरक्षित तर दुसरे असुरक्षित. सुरक्षित लोन घेत असताना तुम्हाला काही संपत्ती गहाण ठेवावी लागते. आणि असुरक्षित लोनसाठी काही गहाण ठेवण्याची गरज नसते.
KCC लोन साठी कागदपत्रे (KKC Loan)
KKC लोन घेण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्राइविंग लाइसेंस आणि शेतीची कागदपत्रे
KKC लोनसाठी असा करा अर्ज
आपल्या जवळ असलेल्या बॅंकेच्या वेबसाईटवर जा, त्यानंतर होम पेजवर आल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड दिसेल. किसान क्रेडिट कार्ड या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर Apply चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून त्यात सर्व माहिती भरा आणि सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर दिसेल. जर तुम्ही पात्र असाल तर पुढील 5 दिवसांच्या आत बँक तुम्हाला संपर्क करेल.. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी बॅंकेला भेट द्यावी लागेल..
Web Title – शेतकर्यांनो! लगेच मिळणार 3 लाख रुपये लोन; येथे पहा कसे मिळणार लोन..!