मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

स्ट्रॉबेरी शेतीची यशोगाथा, ‘या’ फळाच्या लागवडीतून मिळतोय दरमहा 4-5 लाखांचा नफा – Marathi News | Strawberry farming faridkot husband wife earned lakhs success story in marathi

Strawberry Farming Success Story: शेतीमध्ये चांगलं उत्पन्न हवं असेल तर तुम्हाला प्रयोगही वेगवेगळे करावे लागतात. त्यातही प्रत्येक वेळेस यश येतंच असं नाही. असाच एक प्रयत्न कुलविंदर कौर आणि प्रदीप सिंग यांनी केला आहे. त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड करून त्यांनी लाखोंचं उत्पन्न कमावलं आहे.

कुलविंदर कौर आणि त्यांचे पती प्रदीप सिंग हे फरीदकोटच्या सादिक-मुक्तसर रस्त्यावर असलेल्या दीड एकर जमिनीवर गेल्या तीन वर्षांपासून स्ट्रॉबेरीची लागवड करतात. पूर्वी हे दाम्पत्य गहू आणि भाताची पारंपरिक शेती करायचे, पण काहीतरी वेगळं करण्याच्या इच्छेने त्यांना युट्युबवर स्ट्रॉबेरी शेतीबद्दल जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली. पुण्यातून रोपे आयात करून कष्ट करून दरमहा लाखो रुपयांचा नफा ते आजघडीला कमावत आहे.

स्ट्रॉबेरी पिकवण्याच्या आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात प्रदीप सिंग आपल्या पत्नीसोबत खांद्याला खांदा लावून काम करतात. शनिवार वगळता रोज स्ट्रॉबेरीची काढणी केली जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. काढणीनंतर स्ट्रॉबेरी पेटीत भरून फरीदकोट आणि फिरोजपूरच्या मंडईत पाठवली जाते.

हे वाचलंत का? -  नवीन सरकार PM Kisan बंद करणार? मग नीती आयोग का घेत आहे योजनेचा आढावा - Marathi News | Five years of PM Kisan Yojana, check why Niti Aayog is doing it, will PM Kisan be closed

स्ट्रॉबेरीच्या पेरणीसाठी रोपे पुण्यातून आणली जातात. सप्टेंबरमध्ये पेरण्या सुरू होतात आणि नोव्हेंबरपर्यंत फळे तयार होतात. एका प्लॉटच्या पेरणीसाठी सुमारे सात लाख रुपये खर्च येतो आणि दरमहा चार ते पाच लाख रुपयांचा नफा मिळतो, असे ते सांगतात.

त्याचबरोबर कुलविंदर कौर म्हणाल्या की, सुरुवातीला अनुभवाअभावी जास्त खर्च आणि कमी नफा मिळत होता, पण हळूहळू मेहनत आणि तंत्रज्ञानाने काम करून हा यशस्वी व्यवसाय बनला आहे.

प्रयोग केले की यश मिळतं, असं नेहमी म्हटलं जातं. कुलविंदर कौर आणि त्यांचे पती प्रदीप सिंग यांची यशोगाथा देखील तशीच आहे. त्यांनी गहु आणि तांदुळ न लावता, वेगळं काहीतरी करण्याचे धाडस केले आणि त्यांचं यश हे तुमच्यासमोर आहे. आपण वेगळे प्रयोग केले की यश मिळतं. योग्य पद्धतीने प्रयोग राबवल्यास कोणतंही उत्पादन तुमचं वाढू शकतं. फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. हा प्रयोग करताना तुमच्या जमिनीची गुणवत्ता आणि तेथीली वातावरण याचा देखील अंदाज घेतला पाहिजे. कारण, प्रत्येक ठिकाणचं वातावरण वेगळं असतं.

हे वाचलंत का? -  पीएम किसान लाभार्थी यादीतून या शेतकऱ्यांना वगळले.. बघा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ..

लक्षात घ्या की, प्रत्येक ठिकाणचे हवामान आणि जमिनीच्या गुणवत्तेत बदल असतो. त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही प्रयोग करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचं आहे. त्यामुळे प्रयोग करताना खबरदारी घ्या.

हे वाचलंत का? -  Maharashtra Farmer News : शेतकरी दुहेरी संकटात, पिकांवरचं संकट कायम - Marathi News | Maharashtra rain update Farmer News agricultural cotton cultivation crop destroyed


Web Title – स्ट्रॉबेरी शेतीची यशोगाथा, ‘या’ फळाच्या लागवडीतून मिळतोय दरमहा 4-5 लाखांचा नफा – Marathi News | Strawberry farming faridkot husband wife earned lakhs success story in marathi

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj