मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

लाडक्या बहिणींनो, योजनेचे पैसे ‘या’ बिझनेसमध्ये गुंतवा, १-२ तास काम करून, करा लाखोंची कमाई!

Ladki Bahin Yojana Business Idea For Women: राज्य सरकारची महत्त्वाची योजना ‘लाडकी बहीण योजना’ सध्या अनेक महिलांसाठी आधार ठरली आहे. या योजनेअंतर्गत अनेक महिलांना आर्थिक मदत मिळाली असून त्या मदतीचा योग्य उपयोग करून, स्वतःचा बिझनेस उभा करताना अनेकजणी पुढे सरसावल्या आहेत. या योजनेचा सहावा हप्ता सध्या वितरित होतो आहे. मात्र, हा हप्ता फक्त खर्च करण्याऐवजी, जर तो गुंतवणुकीसाठी वापरला, तर छोट्या गुंतवणुकीतूनही मोठा नफा मिळवता येतो. चला, जाणून घेऊया या पैशातून कोणते व्यवसाय सुरू करता येतील.

लाडकी बहिण योजनेचा सहावा हप्ता वितरित | Ladki Bahin Yojana 6th Installment Update

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण योजना’ महिलांसाठी लागू करताना त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा मानस ठेवला आहे. योजनेचा सहावा हप्ता आता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होतो आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना लागू आहे.

या हप्त्याचा योग्य उपयोग करत महिला व्यवसाय सुरू करू शकतात. फक्त 2000 रुपयांच्या या मासिक रकमेचा प्रभावी गुंतवणूक म्हणून उपयोग केल्यास, महिलांना लाखोंचा नफा मिळवणे शक्य होईल.

शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! ड्रोनसाठी असा करा अर्ज, मिळवा ४ लाखांपर्यंत अनुदान!

लाडकी बहिणीच्या हप्त्याचा वापर कशासाठी करू शकता? | Ladki Bahin Yojana Work From Home

1. फ्रीलान्सिंग (Freelancing)
जर तुम्हाला फोटो एडिटिंग, व्हिडिओ बनवणे, ग्राफिक्स डिझाइन किंवा सोशल मीडिया पोस्ट्स तयार करणे येत असेल, तर तुम्ही फ्रीलान्सिंग व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायात, तुम्ही घरबसल्या कंपन्यांसाठी किंवा व्यक्तींसाठी काम करू शकता. इंटरनेटच्या मदतीने अनेक प्लॅटफॉर्मवर तुमचे प्रोफाइल तयार करून, कामे मिळवणे सोपे होते.

हे वाचलंत का? -  लाडक्या बहिणींसाठी 5500 रुपयांचा दिवाळी बोनस!, जाणून घ्या पात्रता आणि महत्त्वाची माहिती

2. यूट्यूब चॅनेल (YouTube Channel)
तुमच्याकडे कुकिंग, डान्सिंग, DIY आयडियाज किंवा स्टोरीटेलिंगचे कौशल्य आहे का? मग वेळ वाया घालवू नका. यूट्यूब हे एक मोठे व्यासपीठ आहे. सुरुवातीला फक्त तुमच्या मोबाईलच्या मदतीने व्हिडिओ बनवा आणि अपलोड करा. एकदा व्ह्यूज आणि सबस्क्राइबर्स मिळायला लागले, की तुमचा चॅनेल मोनेटाईझ होऊन कमाई सुरू होईल.

3. सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
सोशल मीडिया हा एक वाढता व्यवसाय आहे. जर तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा चांगला वापर करता येत असेल, तर तुम्ही छोट्या व्यवसायांसाठी मार्केटिंग सेवा पुरवू शकता. ग्राहकांसाठी प्रोडक्ट्स प्रमोट करण्याचे काम करू शकता. यासाठी तुम्हाला फार मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही.

शेतकऱ्यांनो आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार! इथे बघा तारीख..

4. क्लाऊड किचन (Cloud Kitchen)
तुमच्याकडे स्वयंपाकाची आवड आहे का? मग क्लाऊड किचन ही तुमच्यासाठी एक उत्तम आयडिया आहे. झोमॅटो किंवा स्विगी यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या डिशेसची लिस्टिंग करा. लोक तुमच्याकडून ऑर्डर करतील आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत स्वयंपाक पोहोचवू शकता.

5. हस्तकला व्यवसाय (Handmade Crafts)
जर तुम्हाला हस्तकलेची आवड असेल, तर तुम्ही घरबसल्या वस्त्रनिर्मिती, दागिने, शोभेच्या वस्तू यांसारख्या गोष्टी विकू शकता. यासाठी सोशल मीडिया हे उत्तम साधन ठरू शकते.

लाडकी बहिण योजनेचे निकष

हे वाचलंत का? -  पीक विमाचे १३,००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ!

वय: 21 ते 65 वर्षे
आर्थिक स्थिती: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.

इतर अटी:
कुटुंबात चारचाकी वाहन असल्यास लाभ मिळणार नाही.
सरकारी नोकरीतील व्यक्तींच्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.
कुटुंबातील सदस्य खासदार/आमदार असल्यास महिला अपात्र ठरतील.

या योजनेचा उपयोग कसा केला पाहिजे?

या योजनेच्या पैशाचा फक्त खर्च करण्याऐवजी, त्यातून एक स्थिर उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे. लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी फार मोठी रक्कम लागत नाही. इंटरनेटच्या मदतीने तुम्ही खूप कमी भांडवलात व्यवसाय सुरू करू शकता.

तुमच्याकडे कोणते कौशल्य नाही का? मग फ्री कोर्सेस, यूट्यूब व्हिडिओज किंवा ऑनलाइन क्लासेसमधून तुमचे कौशल्य विकसित करा आणि मग व्यवसाय सुरू करा.


Web Title – लाडक्या बहिणींनो, योजनेचे पैसे ‘या’ बिझनेसमध्ये गुंतवा, १-२ तास काम करून, करा लाखोंची कमाई!

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj