मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

लाल मुळ्याची कमाल, एक किलोला 100 रुपयांचा भाव, सातपुड्याच्या डोंगररांगात फुलली शेती – Marathi News | Nandurbar News red radish, price of 100 rupees per kg, agriculture flourished in the hills of Satpuda

विदेशात शिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्या आता भारतात सुद्धा पिकवल्या जात आहेत त्यातच नंदुरबार सारख्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रात या विदेशी पालेभाज्यांच्या यशस्वी प्रयोग करण्यात आलेला आहे. आपण जेवणामध्ये प्रामुख्याने पांढरा मुळा हा खाण्यासाठी वापरतो. मात्र, लाल मुळा हा फारच कमी लोकांनी पाहिला असेल. या लाल मुळ्याची लागवड नंदुरबार तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. यातून त्यांना उत्पन्न देखील मिळत असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

100 रुपये किलोचा भाव

लाल मुळा हा पांढर्‍या मुळ्याप्रमाणेच असतो. या मुळ्याची चव देखील पांढर्‍या मुळासारखीच असते. त्याचबरोबर यामध्ये भरपूर. अँटीऑक्सिडंट्स आढळतात. जिथे बाजारात सामान्य मुळा 10 ते 20 रुपये किलोने भाव मिळतो त्यातच या लाल मुळा 80 ते 100 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.

हे सुद्धा वाचा

फ्रेंच मुळा असे नाव

लाल मुळा फ्रेंच मुळा म्हणूनही ओळखला जातो जो उच्च श्रेणीची भाजी आहे. त्यात अधिक अँटिऑक्सिडेंट आणि अँटीकार्सिनोजेनिक गुणधर्म आहेत. जे पांढर्‍या मुळा पासून लाल मुळाला खास बनवते. लाल मुळ्याची चव हलकी तिखट असते. मुळे गडद लाल रंगाची असतात आणि पाने गडद हिरव्या रंगाची असतात. लाल रंगामुळे ते दिसायला सुंदर आहे. लाल मुळ्याच्या वापराने कोशिंबीर पौष्टिक असण्यासोबतच दिसायलाही चांगली होते.

हे वाचलंत का? -  गॅस सिलेंडर दरात मोठा बदल! जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक गॅसचे नवे दर, ग्राहकांसाठी दिलासा!

अशी करा पेरणी

लाल मुळ्याची लागवडीसाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा महिना अतिशय योग्य मानला जातो. लागवडीसाठी निचरा होणारी जमीन उत्तम मानली जाते. जमिनीचा सामू 5 ते 7.5 च्या दरम्यान असावा लागतो. लाल मुळ्याची लागवड बियांची पेरणी करुन किंवा नर्सरीत रोपे वाढवूनही करता येते. पेरणीसाठी सुमारे 8 ते 10 किलो बियाणे लागते. व्यावसायिक लागवडीसाठी रोपवाटिका वाढवलेल्या सुधारित वाणांची निवड करावी. पेरणीनंतर साधारण 20 ते 40 दिवस लागतात. एकरी 54 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळू शकते.

नगदी पिकाने होईल फायदा

हे वाचलंत का? -  सोलार फवारणी पंपसाठी असा करा अर्ज.. महाडीबीटीवर मिळवा 50% ते 80% अनुदानाची संधी!

शेती व्यवसयातून केवळ मुख्य पिकातूनच उत्पन्न मिळते असे नाही. काळाच्या ओघात पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. शेतकरी हे देखील नगदी पिकावरच भर देत आहे. भाजी पाल्याच्या लागवडीतून कमी काळात अधिकचे उत्पन्न हे सहज शक्य असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे कृषी तज्ञ डॉ वैभव गुरवे यांनी दिली आहे.

हे वाचलंत का? -  NSD कमांडोचे भविष्य शेतीने बदलले, असे काढतो २५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | After retirement, the jawan held the hand of the earth

लाल मुळ्याची शेती केल्यास तसेच या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यातून चांगला नफा मिळवता येतो. कमी शेतकर्‍यांकडून त्याची लागवड होत असल्यामुळे लाल मुळा अजूनही बाजारात क्वचितच मिळतो. शेतकर्‍यांनी लागवड केल्यास त्यांना सामान्य मुळ्यापेक्षा अधिक नफा मिळू शकतो.


Web Title – लाल मुळ्याची कमाल, एक किलोला 100 रुपयांचा भाव, सातपुड्याच्या डोंगररांगात फुलली शेती – Marathi News | Nandurbar News red radish, price of 100 rupees per kg, agriculture flourished in the hills of Satpuda

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj