मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

केळी वाहतुकीतून रेल्वे मालामाल; सहा महिन्यातच 3 कोटींहून अधिकचे उत्पन्न – Marathi News | Railway generates huge revenue after banana transport Jalgaon Raver Rail freight from banana transport; Income of more than 3 crores in 6 months

केळी वाहतुकीतून रेल्वे मालामाल

किशोर पाटील, प्रतिनिधी, जळगाव :  केळीने जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मालामाल केले आहे. जळगावची केळी साता समुद्रापार पोहचली आहे. केळी उत्पादनात आघाडीवर असलेल्या रावेर तालुक्यातून एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत २९ रॅक शेतमाल भरण्यात आला. तो केवळ दिल्लीच्या मार्केटला नेला असून १ लाख १४ हजार ६७५ क्विंटल एवढा शेतमाल होता. त्याच्या वाहतुकीमधून रेल्वेला ३ कोटी ४५ लाख ८७ हजार ५७७ रुपयाचे उत्पन्न मिळाले. यामध्ये रावेर व निंभोरा या दोन रेल्वे मालधक्क्यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी पावणेचार कोटींचे उत्पन्न

देशात सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणार्‍या जळगाव जिल्ह्यात रावेर तालुका आघाडीवर आहे. केळीच्या हंगामात आवक बेसुमार वाढते, त्यामुळे रोड वाहतुकीतून परराज्यातील बाजारपेठांमध्ये केळी कमी वेळेत व कमी खर्चात पाठवणे शक्य होत नाही. अशावेळी शेतकऱ्यांच्या मदतीला रेल्वे नेहमीच धावते. रेल्वेच्या माध्यमातून जलद आणि तुलनेत कमी खर्चात मालाची निर्यात करणे सोपे झाले आहे. तर केळी वाहतुकीतून रेल्वे सुद्धा मोठा महसूल मिळाला आहे.

हे वाचलंत का? -  Maval Tomato Farming : पाऊण एकर शेतातून पिकलं सोनं; गावरान टोमॅटोने मावळमधील शेतकरी मालामाल - Marathi News | Maval Tomato Farming farmer grown huge tomato from a half acre farm; Gavaran tomato stock farmer earns lakhs

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी २०२३ मध्येही ३४ रॅकच्या माध्यमातून १ लाख २३ हजार ६९० क्विंटल शेतमाल वाहतूक केला होता. त्यामधून रेल्वेला ३ कोटी ७३ लाख ६ हजार ७१६ रुपयाचे उत्पन्न मिळाले होते. तो हंगाम देखील एप्रिल ते सप्टेंबरापर्यंतचा होता. त्यानंतर कुठलाही माल रेल्वेने वाहतूक केला नाही.उत्पादन जास्त असल्यामुळे केळी शेतात तुंबते त्यामुळे परिणाम होऊन भाव कमी मिळतो. यातून शेतकरी नाडला जातो. त्यावर रेल्वेने उपाय केला आहे.

रेल्वेमधून केळी दिल्लीला

हे वाचलंत का? -  Farmer Loan Waiver : लाडक्या बहि‍णीने शेतकर्‍यांचा घास हिरावला; कर्जमाफीचा फैसला केव्हा? का ठरणार निवडणुकीचा जुमला - Marathi News | Farmer Loan Waiver Ladki Bahin Yojana When will the loan waiver be decided? Why will the election be a joke What Minister Manikrao Kokate

यावेळेस फळ बागायतदार सोसायटीच्या माध्यमातून रेल्वेतून केळी दिल्ली व उत्तर भारतात पाठवण्यात आली. दिल्ली स्थानकावर शेतमाल
पोहोचल्यास तेथील स्थानिक व्यपारी उत्तर प्रदेश, हिमाचल, कुल्लू मनाली व इतर भागात केळी विक्री करतात. दरवर्षी मार्च महिन्यापासून नवती केळीच्या कापणीला सुरुवात होते. तर एप्रीलमध्ये कापणीचे प्रमाण वाढते. उन्हात वाहतूक करताना केळी काळी पडून खराब होण्याची भीती असते. तर रोडवेजमधून वाहतुक करण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे ट्रकमध्ये भरलेल्या मालात वरचा माल काळा पडून नुकसान होते. म्हणून एप्रिलपासून परिस्थिती व आवक पाहून रेल्वेमधून केळी दिल्लीला रवाना केली जाते.

हे वाचलंत का? -  Agriculture Budget 2024 : विषमुक्त शेतीला प्राधान्य, नैसर्गिक शेतीसाठी काय योजना, शेतकऱ्यांसाठी बजेट काय केल्या घोषणा - Marathi News | Agriculture Budget 2024 Experiment of toxic free agriculture in the budget; Empowering 1 crore farmers, Nirmala Sitharaman's preference for natural farming, what was announced


Web Title – केळी वाहतुकीतून रेल्वे मालामाल; सहा महिन्यातच 3 कोटींहून अधिकचे उत्पन्न – Marathi News | Railway generates huge revenue after banana transport Jalgaon Raver Rail freight from banana transport; Income of more than 3 crores in 6 months

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj