अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अठरा विविध प्रकारचे धान्याचा गोलाकार पद्धतीने मांडणी करण्यात आली. याच्या मधोमध एक खड्डा करून त्यामध्ये घागर ठेवण्यात आली होती. या घागरीवर पुरी, करंजी, पापड यासारखे विविध साहित्य ठेवण्यात आले होते. प्रत्येक साहित्य विविध घटकाचे प्रतीक मानली जातात आणि या मांडलेल्या घटात रात्रभरातून होणाऱ्या बदलांच्या आधारे दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हे संपूर्ण बदलाचे निरीक्षण करून वाघ महाराज पुढील वर्षभरातील पाऊस पाणी, पीक परिस्थिती सोबतच राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाकीत वर्तवत असतात. त्यानुसार वाघ महाराज यांनी भाकीत वर्तवलं आहे.
हे सुद्धा वाचा – Pipe Line Scheme: पाईप लाईन करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान तात्काळ आपला अर्ज करा
काय आहे यंदाचं भाकीत?
अंबाडी कुलदैवत आहे – रोगराई चे प्रमाण आहे
कपाशी मोघम आहे, फारसी तेजी नसणार.
ज्वारी – सर्वसाधारण येईल, भावात तेजी राहणार.
तूर – मोघम, पीक चांगले येईल.
मूग – मोघम, सर्वसाधारण पीक येईल
उडीद – मोघम, सर्वसाधारण पीक येईल
तीळ – सर्वसाधारण पीक येईल, नासाडी होईल
बाजरी – पीक साधारण येईल, नासाडी होईल.
भादली – कमी अधिक पीक येईल, रोगराई वाढेल
साळी – चांगले येईल पीक, तेजी असणार
मठ – सर्वसाधारण पीक येईल. तेजी असणार
जवस – नासाडी होणार, तेजी राहणार, पीक चांगले येणार
लाख – तेजी राहणार, सर्वसाधारण पीक येईल
वाटाणा – मोघम, सर्वसाधारण पीक येईल
गहू – तेजी राहणार, पीक चांगले राहील
हरभरा – मोघम, काही ठिकाणी चांगले राहील, रोगाने नुकसान होण्याची शक्यता
करडी – संरक्षण खाते म्हणतात याला, पीक चांगले आहे
घागर
पहिला महिना जून – कमी अधिक पाऊस येणार, पेरणी उशीर होऊ शकते
दुसरा महिना जुलै- पाऊस सर्वसाधारण राहील
तिसरा महिना ऑगस्ट – एकदम चांगला पाऊस येणार, अतिवृष्टीची शक्यता
चौथा महिना सप्टेंबर – पाऊस कमी आहे, पण अवकाळी पाऊस पडणार
Most Read Stories
- शेवगा पाल्याची भूकटी थेट साता समुद्रापार अमेरिकेत रवाना, शेतकऱ्याचा हटके प्रयोग – Marathi News | A new experiment by Mahadev More farmer from Solapur Karmala, who exports shevagya moringa powder to America
- लाल मुळ्याची कमाल, एक किलोला 100 रुपयांचा भाव, सातपुड्याच्या डोंगररांगात फुलली शेती – Marathi News | Nandurbar News red radish, price of 100 rupees per kg, agriculture flourished in the hills of Satpuda
- शेतकर्यांसाठी आनंदवार्ता, सोयाबीन खरेदीसाठी नका लावू लांबच लांब रांगा, इतक्या दिवसांची मुदत वाढ
- नंदुरबारच्या महिला शेतकऱ्यांची यशोगाथा! ‘मशरूम’ने उंचावली मान – Marathi News | A successful mushroom farming experiment was conducted by the women of Bokalzar in Navapur taluka, 25 beneficiaries are taking mushroom production at their own homes
- Budget 2025: कीटकनाशकांवरील GST सरकार कमी करणार? कृषी क्षेत्राच्या अपेक्षा जाणून घ्या – Marathi News | Budget 2025 Will The Government Reduce Gst On Pesticides
Web Title – यंदा पेरणी उशिरा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस… काय आहे भेडंवड घट मांडणीतील भाकीत? – Marathi News | Bhendwal Ghat Mandani Prediction 2023 unseasonal rain continue till september news in marathi