मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

PM Kisan Yojana च्या लाभार्थ्यांना सरकार देणार हे गिफ्ट, पाहा काय होणार फायदा – Marathi News | Government will gift PM Kisan Card to the beneficiaries of PM Kisan Yojana

नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या पीएम किसान योजनेत आता शेतकऱ्यांना एक गिफ्ट मिळणार आहे. केंद्र सरकारने गरीब आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून पीएम किसान योजना साल 2019 पासून सुरु केली आहे. या मोहिमेद्वारे वर्षांतून सहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाते. या योजनेचा पंधरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. आता या योजनेतून शेतकऱ्यांना आणखीन एक गिफ्ट मिळणार आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान ऋृण पोर्टल लॉंच केले आहे. या पोर्टलद्वारे शेतकरी सहजपणे किसान क्रेडीट कार्डसाठी अर्ज करु शकणार आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना सबसिडी सह कर्ज सुविधा देखील मिळणार आहे. शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज देण्यासाठी हे पोर्टल तयार केले आहे. शेतकरी शेतीसाठी सावकारांकडून कर्ज घेतात. त्याचे व्याज जादा असते. पीएम किसान लाभार्थ्यांनाही किसान क्रेडीट कार्डचा लाभ मिळणार आहे.

हे वाचलंत का? -  Onion Price | कांद्याच्या दरात घसरण, महिन्याभरात कांद्याचे दर निम्यावर - Marathi News | Onion price in Solapur market committee at half, big fall in a month marathi news

1 ऑक्टोबर 2023 पासून केंद्र सरकार घर-घर किसान क्रेडीट कार्ड मोहिम सुरु करणार आहे. यावर्षअखेरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. ही मोहिम डीजिटल देखील सुरु राहणार आहे. बॅंका, पंचायती आणि जिल्हा प्रशासनाला देखील या योजनेत सहभागी केले आहे. पीएम किसानच्या लाभार्थ्यांनाही येत्या तीन महिन्यात किसान क्रेडीट कार्ड मिळणार आहे.

किसान क्रेडीट कार्ड म्हणजे ?

सरकारने साल 1998 मध्ये किसान क्रेडीट कार्डची सुरुवात केली होती. यात शेतकऱ्यांना चार टक्के दराने कर्ज दिले जाते. इतरांहून हे कर्ज खूपच स्वस्त आहे. या कार्डासाठी देशातील सर्व शेतकरी पात्र आहेत. ही योजना भारत सरकार, भारतीय रिझर्व्ह बॅंक ( RBI ) आणि नाबार्डने मिळुन सुरु केली आहे.

हे वाचलंत का? -  M. S. Swaminathan : शेतकऱ्यांना बळ देणारा MSP अन् 'तो' फॉर्म्युला; स्वामिनाथन अहवाल नेमका काय आहे? - Marathi News | Mumbai M S Swaminathan Passed Away Harit Kranti swaminathan aayog report Farmer Marathi News

पीएम किसानचा 15 वा हप्ता कधी  ?

देशातील शेतकरी पीएम किसानचा 15 वा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहात आहेत. या योजनेत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. दोन हजार रुपयांच्या हप्त्यात ही रक्कम वर्षांतून तीन वेळा मिळते. मिडीया रिपोर्टनूसार शेतकऱ्यांना 15 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात मिळू शकतो. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा होणार आहे.


Web Title – PM Kisan Yojana च्या लाभार्थ्यांना सरकार देणार हे गिफ्ट, पाहा काय होणार फायदा – Marathi News | Government will gift PM Kisan Card to the beneficiaries of PM Kisan Yojana

हे वाचलंत का? -  कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांंसाठी शिंदे सरकारकडून भेट, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde big announcement in the assembly for the farmers deprived of loan waiver

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj