नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर गिफ्टचा वर्षाव केला आहे. सणासुदीपूर्वीच मोदी सरकराने काही योजनांचे गिफ्ट कास्तकारांना दिले आहे. देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. या सेवा त्यांना ऑनलाईन पण घेता येतील. केंद्र सरकारचे हे पाऊल देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या (Schemes For Farmers 2023) जीवनात आनंद आणेल, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षण करण्यासाठी मदत करेल, असे मानण्यात येत आहे. या चार योजनांविषयी केंद्र सरकारने घोषणा केली आहे. कोणते बदल होत आहेत शेतकऱ्यांच्या जीवनात..
1 : किसान ऋण पोर्टल (Kisan Rin Portal)
केंद्र सरकारने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंगळवारी 19 सप्टेंबर 2023 रोजी या सेवेचा शुभारंभ केला. नवीन दिल्लीत दोन पोर्टल सुरु करण्यात आले. यामध्ये एक शेतकरी कर्ज पोर्टल आहे. किसान ऋण पोर्टलमुळे (Kisan Rin Portal) शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर कर्ज मिळेल. ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही. त्यांना या पोर्टलचा फायदा होईल. शेतकरी, आधार क्रमांकाच्या आधारे या योजनेत नोंदणी करु शकतात. शेतकऱ्यांना स्वस्त व्याज दरावर कर्ज घेता येईल. शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज परतफेड केल्यास त्यांना सबसिडीचे गिफ्ट मिळेल. हे पोर्टल शेतकऱ्यांशी संबंधीत डेटा विस्तृत स्वरुपात समोर येईल. या पोर्टलवर कर्जाचे वितरण, व्याजावरील सवलत, योजनेचा फायदा, बँकांसोबतची संलग्नीकरणाची माहिती मिळेल.
हे सुद्धा वाचा
2 : केसीसी इनिशिएटिव (KCC Initiatives)
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. त्याला केसीसी इनिशिएटिव (KCC Initiatives) असे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या योजनेची माहिती दिली. शेतकऱ्यांना मदतीसाठी बदलासह नवीन योजना आणण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड कर्जासाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
3 : घर-घर केवायसी (Door-to-Door KCC)
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना, किसान क्रेडिट कार्डचा फायदा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने घर-घर केवायसी (Door-to-Door KCC) मोहिम हाती घेतली आहे. आता केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना किसान क्रेडिट कार्डची माहिती देईल. लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेत सध्या दरवर्षी शेतकरी 6 हजारांची आर्थिक मदत मिळवत आहेत.
4 : विंड्स पोर्टल (WINDS Portal)
कोणत्याही देशाची शेती ही निसर्ग- ऋतुमानावर आधारीत असते. केंद्र सरकारने मंगळवारी किसान ऋण पोर्टलसोबतच विंड्स पोर्टलचा (WINDS Portal) श्रीगणेशा केला. वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम्स असे या पोर्टलचे संपूर्ण नाव आहे. या पोर्टलच्या सहायाने शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा, पावसाची अपडेट, हवामानातील बदल, वादळांची माहिती आणि इतर माहिती मिळेल. या पोर्टलची सुरुवात जुलै महिन्यात करण्यात आली होती. आता एनालिटिक्स टूलच्या सहायाने शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
Web Title – Schemes For Farmers : शेतकऱ्यांवर मोदी सरकार मेहरबान, सणांपूर्वीच गिफ्टचा पाऊस – Marathi News | Schemes For Farmers 2023 Another gift of the Modi government to farmers, these four big schemes will benefit Kisan Rin Portal, KCC Initiatives, WINDS Portal