मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

PM Kisan 15th Installment : या तारखेला जमा होणार पीएम किसानचा हप्ता, पण हे काम केले का? – Marathi News | PM Kisan Samman Nidhi scheme 15th installment will be deposited on 30 September 2023, KYC verification

नवी दिल्ली | 12 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेने (PM Kisan 15th Installment) शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरला आहे. वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही मदत करण्यात येते. प्रत्येक वर्षी या योजनेतंर्गत तीन हप्ते मिळतात. या हप्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये जमा करण्यात येतात. शेतकऱ्यांच्या खात्यात 14 वा हप्ता जमा करण्यात आला. 27 जुलै रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. DBT माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. 8.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 17,000 कोटी रुपये जमा करण्यात आले. पीएम शेतकरी सन्मान योजनेचा 15 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या या तारखेला ही रक्कम जमा होईल. पण त्यासाठी हे काम करणे आवश्यक आहे.

योजनेला झाली पाच वर्षे

केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरु केली होती. त्यावेळी ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांपुरती मर्यादीत होती. पण आता या योजनेचा विस्तार झाला आहे. सगळ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. या योजनेतंर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात 2000-2000-2000 रुपयांचे तीन हप्ते जमा होतात. एका वर्षात एकूण 6,000 रुपये जमा होतात. या योजनेतंर्गत पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै या दरम्यान देण्यात येतो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या काळात देण्यात येतो. तर तिसरा हप्ता केंद्र सरकार 1 डिसेंबर ते 31 मार्च या दरम्यान हस्तांतरीत करण्यात येतो.

हे वाचलंत का? -  PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा मिळेल लाभ, लवकर करा हे काम - Marathi News | PM Kisan Samman Nidhi Yojana If you want the 15th installment of PM Kisan Yojana, then do it quickly, the process is easy

हे सुद्धा वाचा



या तारखेला होईल जमा

सप्टेंबर महिन्याच्या अंतिम तारखेला या योजनेतंर्गत रक्कम जमा होईल. 15 वा हप्ता 30 सप्टेंबरपूर्वी खात्यात जमा होईल. पण त्यासाठी ई-केवाईसी (e-KYC) व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. जर हे काम वेळेत पूर्ण नाही केले तर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी झटपट हे काम उरकणे आवश्यक आहे.

यादीत आहे की नाही नाव

15 वा हप्ता जमा होणार आहे. या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तापसण्यासाठी अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करावे लागेल. या ठिकाणी लाभार्थ्यांची यादीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील भराय सविस्तर माहिती द्या, या पर्यायावर क्लिक केल्यानंतर यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा. योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल.

हे वाचलंत का? -  PM Kisan | केव्हा जमा होणार पीएम किसानचा हप्ता, लाभार्थ्यांची यादी तपासली का? - Marathi News | Check the list of beneficiaries when the 15th installment of PM Kisan Yojana will be deposited, the amount will be deposited in the account on this day

असे करा ई-केवायसी

  • पीएम किसान मोबाईल एपवर, फेस ऑथेंटिकेशन फीचर येते.
  • याठिकाणी शेतकरी घरबसल्या ई-केवायसी करता येते.
  • त्यासाठी फिंगरप्रिंट आणि ओटीपी गरज नसेल.


Web Title – PM Kisan 15th Installment : या तारखेला जमा होणार पीएम किसानचा हप्ता, पण हे काम केले का? – Marathi News | PM Kisan Samman Nidhi scheme 15th installment will be deposited on 30 September 2023, KYC verification

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj