नवी दिल्ली : काही लोकांना असं वाटते की, शेती किंवा मच्छलीपालनात फारशी कमाई होत नाही. फक्त नोकरी करून चांगले उत्पन्न मिळवले जाऊ शकते. पण, असं काही नाही. भारतातील काही युवकांनी नोकरी सोडून घरी व्यवसाय सुरू केलेत. हे युवक फक्त व्यवसायच करत नाही, तर गावात रोजगार निर्मिती करतात. या युवकांत बिहारमध्ये राहणारे दोन सख्खे भाऊ आहेत. यापैकी एका भावाने सव्वा लाख रुपये महिन्याची नोकरी सोडली. गावात येऊन मच्छीपालन सुरू केले. आता त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. हे दोन्ही भाऊ उमामगंज भागातील पडरिया गावचे रहिवासी आहेत. एका भावाचं नाव आहे करणवीर सिंह तर दुसऱ्या भावाचे नाव आहे विशाल कुमार सिंह. करणसिंह यांनी दिल्लीतून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. १२ वर्षे दुबईतील हॉटेलमध्ये नोकरी केली. परंतु, लॉकडाऊनमध्ये घर परत आले ते गेलेच नाही. गावात त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा प्लान केला. काही तज्ज्ञांशी सल्ला करून त्यांनी आधुनिक शेती आणि मच्छीपालन सुरू करण्याचा प्लान केला.
कृषी मंत्र्यांनी केले सन्मानित
विशाल कुमार सिंह यांचा दिल्लीत स्वतःचा व्यवसाय होता. पण, लॉकडाऊनमध्ये तो व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे त्यांनी गावात येणे पसंत केले. दोन एकरचा खासगी तलाव तसेच ९ एकरचा तलाव लिजवर घेऊन मच्छीपालन सुरू केले. आता दोन्ही भाऊ मच्छीपालनातून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. करणवीर सिंह म्हणतात, सुरुवातीला दीड वर्षे त्यांना गुंतवणूक करावी लागली. कमाई नाहीच्या बरोबर होती. हळूहळू नफा वाढत गेला. मच्छीपालनासाठी बिहारच्या कृषी मंत्र्यांनी त्यांना सन्मानित केले.
या जातीचे मच्छीपालन
विशाल कुमार सिंह यांचा दिल्लीत व्यवसाय होता. पण, चायनीज माल आल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. हजारीबाग येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. परंतु, लॉकडाऊनमध्ये त्याही व्यवसायात तोटा झाला. त्यामुळे विशाल यांनी करणवीरसोबत मच्छीपालन सुरू केले. यातून त्यांना वार्षिक दहा लाख रुपयांचा नफा होत आहे. रुपचंदा, इंडियन मेजर कार्प, ग्रास कार्प आणि पहाडी मच्छीपालन करतात. स्थानिक बाजारात याची विक्री करतात. याची मागणी औरंगाबादपर्यंत होत आहे.
करणवीर सिंह यांनी सांगितलं की, दोन्ही भाऊ मिळून १५ ते २० टन मासे विकतात. यातून त्यांची लाखो रुपयांची कमाई होते. या व्यवसायात त्यांनी १० ते १५ लोकांना रोजगार दिला. शिवाय वर्षाला दहा लाख रुपायांचा शुद्ध नफा कमावतात.
Web Title – Fisheries : दुबईतील नोकरी सोडून सुरू केले मच्छीपालन, १५ जणांना दिला रोजगार – Marathi News | 15 people were given employment by fish farming in the village