मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

पावसाअभावी बळीराजा हतबल, महिनाभरापासून पाऊस गायब झाल्यामुळे… – Marathi News | The drought situation in maharashtra Rain update farmer crop agricultural news

वाशिम : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने (Rain update) दडी दिल्याने पाण्याअभावी खरिपाची सोयाबीन, कपाशी, तूर ही पिकं सुकत असून उभ्या पिकांना कसे वाचवावे या चिंतेत शेतकरी आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकरी आटापिटा करताना दिसून येत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था (drought situation) आहे. त्या शेतकऱ्यांनी तुषार संचच्या माध्यमातून पिकांना पाणी देत आहेत. मात्र पुढील काही दिवस वरून राजा बरसला नाही, तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांच्या पिके (farmer crop) करपून जाण्याची भीती आहे.

वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टीतून सावरून कसाबसा पुढे मार्गक्रमण करीत असलेल्या शेतकऱ्याचे सोयाबीन ह्या पिकाला सध्या फलधारणा अवस्था असताना पावसाकडे मागील दोन आठवड्यांपासून शेतकरी नजरा लावून बसलेला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी स्पिंकलरद्वारे शक्य तेवढी पावसाअभावी भेगाळलेली शेत जमीन भिजवून पिकाची तहान भागवण्याचा पिकं वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

नांदेडमध्ये खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेले उडीद आणि मुगाचे पीक तोडणीला आले आहे. सध्या शेत शिवारात उडीद मूगाच्या शेंगा तोडणी करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. अपुऱ्या पावसामुळे उडीद आणि मुगाच्या पिकात जवळपास पन्नास टक्केच फलधारणा झाली आहे.

हे वाचलंत का? -  पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज.. अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी आव्हान की संधी?

हे सुद्धा वाचा



अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने कोकणातल्या भाजीपाल्याच्या दरात चढउतार सुरुच आहेत. 200 रुपयांवर लसूणचे भाव आता १०० ते १५० रुपये किलो झाला आहे. श्रावण महिना असल्याने पालेभाज्यांना जास्त मागणी आहे. तर आल्याचे दर देखिल तेजीत असलेले पहायला मिळत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवर हुमणी, खोडकिडीचा तसेच विषाणूजन्य पिवळा मोझॅक रोगाचा, तर कपाशीवर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहेत. यामुळे खरीब हंगाम वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आता शेकडो हेक्टर शेती धोक्यात आल्यामुळे शेतकरी डोक्याला हात लावून बसत आहेत.

हे वाचलंत का? -  Crop Insurance : 1 रुपयांत पीक विमा योजनेत गैरप्रकार; योजना खरंच बंद होणार? काय म्हणाले राज्याचे कृषीमंत्री - Marathi News | Crop Insurance Corruption Crop Insurance Scheme at Rs 1; Will the scheme close? What did the state agriculture minister Manikrao Kokate say


Web Title – पावसाअभावी बळीराजा हतबल, महिनाभरापासून पाऊस गायब झाल्यामुळे… – Marathi News | The drought situation in maharashtra Rain update farmer crop agricultural news

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj