नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी (PM Kisan) एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात ६ हजार रुपये देतात. त्यामध्ये वाढ करण्याची शक्यता असल्याची माहिती एका वेबसाईटनं दिली आहे. पीएम किसान सन्मान (PM Kisan Samman Nidhi news in marathi) निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबियांना वर्षाला सहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात दिले जातात. चार महिन्याला दोन हजार रुपये खात्यात जमा केले जातात. त्यामध्ये १ हजार रुपयाने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
एमएसपी अंतर्गत खरेदी वाढविण्यावरही विचार
केंद्र सरकार आणखी एक शेतकऱ्यांच्या हिताचं पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी अंतर्गत खरेदी वाढविण्याचा विचार केला जात आहे. ग्रामीण उत्पन्नात कोणतीही घट होणार नाही.
पतंप्रधानाच्या कार्यालयासमोर ठेवला प्रस्ताव
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पंतप्रधानाच्या कार्यालयासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारकडून हा प्रस्ताव मान्य केल्यास पीएम किसान सन्मान निधी योजनेत 20 हजार ते 30 हजार करोड़ रुपयांचा खर्च वाढणार आहे. त्याचबरोबर हा सुध्दा एक प्रश्न आहे की, हा प्रस्ताव प्रत्यक्षात कधी येणार हे निश्चित नाही. पण असं म्हटलं जात आहे की, चार राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याच्या आगोदर हा निर्णय घेण्यात येणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ आणि तेलंगाना या राज्यात यावर्षी निवडणुका होण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा
मध्यप्रदेशात अधिक शेतकरी आहेत. त्याचबरोबर उत्पादन घेण्यात सुध्दा शेतकरी त्या राज्यात अग्रेसर आहे. त्याच्या खालोखाल राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्य आहेत. या राज्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुक होण्याची शक्यता आहे. समज केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधीमध्ये वाढ केल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्याचबरोबर सध्या सत्तेत असलेल्या सरकारला सु्ध्दा त्याचा फायदा होईल.
Web Title – PM Kisan: पंतप्रधान कार्यालयासमोर ठेवला प्रस्ताव, पीएम किसान सन्मान निधीमध्ये होणार मोठी वाढ ? – Marathi News | PM Kisan Samman Nidhi news in marathi maharashtra farmer news kisan scheme