नवी दिल्ली : नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर बहुतेक लोकं आराम करतात. पेन्शनमधून आरामशीर दिवस काढू, असं बहुतेकांना वाटते. परंतु, बिहारच्या एका सेवानिवृत्त जवानाने सेवानिवृत्तीनंतर कमाल केली. गावात येऊन जवानाने भाजीपाल्याची शेती केली. यातून त्यांना आधीपेक्षा जास्त उत्पन्न सुरू झाले. ते आता वर्षभर भाजीपाला विकून लाखो रुपयांची कमाई करतात. सेवानिवृत्त जवान चम्पारण जिल्ह्यातील पिपरा कोठी भागातील सूर्य पूर्व पंचायतचा रहिवासी आहे. त्यांचं नाव आहे राजेश कुमार. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर आराम करण्याऐवजी शेतीचा मार्ग निवडला. त्यांनी शेती सुरू केली तेव्हा गावातील लोकं मजाक उडवत होते. राजेशने त्यांचं काही मनावर लावून घेतलं नाही. आपलं काम सुरूच ठेवलं. जेव्हा फायदा सुरू झाला तेव्हा लोकांची बोलती बंद झाली.
सुरुवात पपईने केली
राजेश सिंह यांनी प्रयोग म्हणून पपईची लागवड केली. पहिल्या वर्षी त्यांना १२ लाख रुपयांची कमाई झाली. त्यानंतर लोकांची तोंड बंद झालीत. दुसऱ्या वर्षी त्यांनी केळी आणि हिरव्या भाजीपाल्याची शेती सुरू केली. लवकी लावले. रोज ३०० लवकी बाजारात जातात. त्यातून त्यांना रोज चार-पाच हजार रुपये मिळतात. अशाप्रकारे ते दीड लाख रुपयांची महिन्याला कमाई करतात.
व्यापारी गावात येऊन खरेदी करतात लवकी
राजेश कुमार यांना भाजीपाला विकण्यासाठी बाजारात जाण्याची गरज नाही. व्यापारी शेतात येऊन भाजीपाला खरेदी करतात. गोपालगंज, सीवान, सीतामढी, शिवहर येथील व्यापारी राजेश कुमार यांच्या शेतात भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात.
लवकीच्या शेतीने वाढले उत्पन्न
राजेश कुमार यांनी लवकी लावले तेव्हा त्यांना १० ते १२ हजार रुपये खर्च आला. खर्च वजा करता ते महिन्याला दीड लाख रुपयांचा नफा कमावतात. बहुतेक सर्व कामं ते मजुरांकडून करून घेतात. स्वतः व्यवस्थापन करतात. जमिनीची मशागत, खत, बी-बीयाणे यांचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना भाजीपाल्यातून चांगला फायदा होत आहे. शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास नक्कीच यश मिळते.
Web Title – जय जवान, जय किसान; सेवानिवृत्तीनंतर धरली शेतीची वाट, दीड लाख रुपये कमावतो महिन्याला – Marathi News | After retirement, the jawan took up agriculture