मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

व्यवसाय सोडून सुरू केली डाळिंबाची शेती; आता कमावतो वर्षाला ४० लाख रुपये – Marathi News | Shravan Singh quits his clothing business and earns 40 lakhs a year from orchard cultivation

नवी दिल्ली : राजस्थानात पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. फळबाग लावल्यामुळे शेतकरी आनंदी आहेत. त्यांचे उत्पन्न लाखो रुपयांत होत आहे. आता आपण राजस्थानच्या अशा शेतकऱ्याविषयी पाहणार आहोत ज्याने लिंबू, डाळिंब, आंबा, चिकू आणि काकडीची शेती केली. यातून ते दरवर्षी सुमारे ४० लाख रुपयांची कमाई करत आहेत. या डाळिंबाला विदेशातही मागणी आहे. शेतकरी श्रवण सिंह यांच्या बागेत डाळिंबाचे पाच हजार झाडं आहेत. दुसरे पाच हजार झाडं त्यांनी त्यांच्या भावाच्या फार्महाऊसवर लावले. याशिवाय तायवाई पिंक पेरू, केसर आंब्याची जातीही शेतात लावली. सेंद्रीय पद्धतीने ते सर्व शेती करतात.

सिरोही जिल्ह्यातील शेतकरी श्रवण सिंह शिकलेले शेतकरी आहेत. ते पदवीधर आहेत. सुरुवातीला ते रेडिमेट कपड्यांचा व्यवसाय करत होते. परंतु, व्यवसायात त्यांचे मन लागत नव्हते. श्रवण सिंह यांनी फळबाग लावण्याचा निर्णय घेतला. आधुनिक पद्धतीने लिंबू, डाळिंब, आंबा, चिकू आणि काकडीची शेती त्यांनी केली. यातून त्यांना वर्षाला ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

हे वाचलंत का? -  अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ₹6000 जमा.. बघा लाभार्थी यादी…

१२ हेक्टरमध्ये लिंबूचे शेती

श्रवण सिंह म्हणतात, फळबागेची सुरुवात त्यांनी पपईपासून केली. यात त्यांना चांगला फायदा झाला. फळबाग लागवडीचे क्षेत्र ते वाढवत गेले. तिसऱ्या वर्षी त्यांना १८ लाख रुपयांचा फायदा झाला. त्यानंतर त्यांनी २०११ मध्ये लिंबूची लागवड केली. २०१३ मध्ये त्यांनी डाळिंबाचे रोप लावले. दोन वर्षांनंतर त्यांना डाळिंबाचे उत्पादन मिळाले. श्रवण सिंह यांनी डाळिंब बांग्लादेश, नेपाळ आणि दुबईला पाठवले. लॅबमध्ये टेस्ट झाल्यानंतरच फळं बाहेर देशात पाठवली जातात. रिलायन्स फ्रेश, सुपरमार्केट, इरीगेशनसारख्या मल्टिनॅशन कंपन्यांना ते फळं पुरवतात.

अंगुरावर प्रयोग सुरू

श्रवण सिंह हे आता अंगुरावर प्रयोग करत आहेत. डाळिंब, लिंबू, पेरू विकून दरवर्षी सुमारे ४० लाख रुपये उत्पन्न मिळवतात. आता त्यांनी आपला मोर्चा अंगुर लागवडीकडे वळवला आहे. यात कितपत यश येते, हे येणारी वेळच सांगेल.

हे वाचलंत का? -  lok sabha election 2024: शेतकऱ्यांचा अनोखा फंडा, कुठे कांदे, कुठे टोमॅटोचा वापर करुन मतदान - Marathi News | Lok sabha election 2024 Voting using tomatoes, onions in Nashik marathi news

हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांनो, पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची तारीख ठरली! बघा कधी मिळणार हप्ता..


Web Title – व्यवसाय सोडून सुरू केली डाळिंबाची शेती; आता कमावतो वर्षाला ४० लाख रुपये – Marathi News | Shravan Singh quits his clothing business and earns 40 lakhs a year from orchard cultivation

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj