मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

एक भाजी मटणापेक्षा महाग झाल्यामुळे सगळीकडं त्या भाजीची चर्चा सुरु आहे. सध्या 1200 रुपये किलोचा दर अजूनही लोकं ती खरेदी करण्यासाठी अधिक गर्दी करीत आहेत. – Marathi News | Natural mushroom benefits mushroom wild rice gondia news in marathi

गोंदिया : गोंदिया (GONDIA) जिल्ह्यातील बाजारपेठेत मटणापेक्षाही दुप्पट पटीने मशरूम विकला जात आहे. मशरूम (mushroom 1kg price) किंमत तब्बल 1200 रुपये प्रति किलोआहे. प्रत्येक तालुक्यात मशरूमची विक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. गोंदिया शहरातील जंगली मशरूमची मटणापेक्षा जास्त दराने विक्री सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे. सध्या मशरूम किंमत ही 1200 ते 1300 रुपये आहे. सध्या मटण 650 रुपये किलो आहे. मटणापेक्षा दुप्पट पटीने महाग दराने मशरूम मिळत आहे. मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरु झाल्यापासून मशरूम बाजारात विक्रीसाठी आले आहेत. मटणाला तोडीस तोड म्हणून मशरूमची गणना होते असे खाणारे सांगतात.

गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल परिसर आहे. त्यामुळं त्या भागात अधिक पाऊस असतो. ज्यावेळी तिथं पाऊस सुरु होतो, त्यावेळी तिथं मशरूम यायला सुरुवात होते. रानातल्या मशरुमची कुठेही लागवड केली जात नाही. जंगलव्याप्त भागात नैसर्गिक पद्धतीने हे मशरूम स्वत: उगवते. गावकरी सकाळी जंगलात जाऊन मशरूम खोदून आणतात. त्यानंतर मशरूम स्वच्छ पाण्यानं धुवून विक्रीसाठी बाजारात घेऊन जातात. मशरूम हे आरोग्यासाठी पोषक मानले जाते.

हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांनो, असे तपासा कापूस व सोयाबीन अनुदान यादीतील तुमचे नाव! जाणून घ्या सोपी पद्धत..

काही लोकं मशरूमची शेती करतात, ही शेती खूप कमी कालावधीची असते. त्याचबरोबर त्यातून चांगले पैसे मिळत असल्यामुळे ते करण्याकडे अनेक लोकांचा कल आहे. विशेष म्हणजे मशरुम चांगल्या प्रकारची असतील तर त्याला बाजारात अधिक पैसे मिळतात.

हे सुद्धा वाचा



हे वाचलंत का? -  कर्टुला लागवडीतून शेतकरी झाला मालामाल, तीन महिन्यांत ९ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Nanded farmer earns lakhs from curtula cultivation

गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील जंगलात मशरूम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्या भागात बांबू म्हणजे जंगलात याचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. श्रावण महिन्यात नागरिक मांसाहार करीत नाहीत. त्यामुळं या काळात मशरूमला मोठी प्रमाणात मागणी असते. आयुर्वेदिकसाठी देखील मशरूमचे मोठे महत्त्व आहे. आता चर्चेत असलेले पीक म्हणजे मशरूमची शेती, सध्या गोंदिया शहरातील बाजारपेठेत जंगली मशरूमला मटणापेक्षा प्रति किलो दुप्पट दर असल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होत आहे. तसेच मशरूमच्या विक्रीतून विक्रेत्याला चांगलीच कमाई करत आहेत. जुलै शेवट ते संपूर्ण ऑगस्ट महिन्यात मशरूमची जास्तच मागणी असते.

हे वाचलंत का? -  MS Swaminathan | हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन - Marathi News | Father of Green Revolution Dr. M. S. Swaminathan passed away at the age of 98


Web Title – एक भाजी मटणापेक्षा महाग झाल्यामुळे सगळीकडं त्या भाजीची चर्चा सुरु आहे. सध्या 1200 रुपये किलोचा दर अजूनही लोकं ती खरेदी करण्यासाठी अधिक गर्दी करीत आहेत. – Marathi News | Natural mushroom benefits mushroom wild rice gondia news in marathi

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj