नाशिक : जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात महाराष्ट्रातील बुहतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस (nashik rain update) सुरु झाला. त्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील (Kharip season crop) रोपं चांगली आली आहेत. त्याचबरोबर पाऊस सुरु झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली. मागच्या महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पीकं सुध्दा जोमात आली. पण मागच्या आठदिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे शेतकरी अधिक चिंतेत आहे. शेतकरीवर्ग (nashik farmer news) पावसाची वाट पाहत असून पाऊस पडल्यास शेतकऱ्यांचं मोठं नुकसान टळलं जाणार आहे.
पावसाने दांडी मारल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत
नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. यावर्षी चांगला पाऊस नसल्याने पिकांचं मोठं नुकसान होणार असल्याचं शेतकरी बोलून दाखवत आहेत. कांदा उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आसलेल्या नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ट्रॅकरच्या पाण्यावर कांद्याची रोप जगवली, आता कांदा लागडीसाठी योग्य झाले असून पावसाअभावी लागवड करता येत नाही. लागवडीस आलेले रोपे आता पिवळे पडत असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
मालेगाव, मनमाड, चांदवड भागात युरिया खताची कृत्रिम टंचाई आहे. कृषी सेवा दुकानदारांकडून शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. नाशिकच्या मनमाड चांदवड भागात आधीच पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असून काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र, कृषी सेवा दुकानदारांकडून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करत असून खादीची गोणी घ्या तरच युरिया मिळेल, अशी आठ घातल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
हे सुद्धा वाचा
बळीराजाच्या जीवाला घोर…
जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये दमदार पावसाचं आगमन झालं, त्यामुळे पेरण्यांना वेग आला होता. मात्र, आता ऑगस्ट महिना संपत आला तरी वरून राजाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या पिकांची वाढ खुंटली आहे. वातावरणात पावसाची कोणतीही चिंन्हे दिसून येत नसल्याने बळीराजाच्या जीवाला घोर लागला आहे.
Web Title – पाऊस नसल्याने कांद्याची रोपे तयार होऊनही लागवड…, शेतकऱ्याने सांगितली अडचण – Marathi News | Farmers are worried as there is no rain in Nashik district