सुनील जाधव, मुंबई : बदलत्या हवामानाच टोमॅटो पिकावर (Tomato Rate Today) इतका परिणाम झाला की, टोमॅटो थेट दोनशे रुपये महाग झाला होता. देशात महत्त्वाच्या शहरात टोमॅटोची विक्री दोनशे रुपयांच्या पलिकडे झाली असल्याची चर्चा आजही कानावर पडते. सध्या टोमॅटोच्या दरात बदल झाला असून ग्राहकांमध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. टोमॅटोच्या किमती कमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे मोठ्या शहरात टोमॅटो आता १०० रुपयांच्या आसपास मिळत आहे. टोमॅटोची आवक वाढल्यामुळे दर कमी (Tomato Rate Decreased) झाला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी सांगितली. मुंबईच्या भायखला मार्केटमध्ये (mumbai byculla market) टोमॅटोच्या 50 ते 55 गाड्या दाखल झाल्या आहेत.
मुंबईत टोमॅटोची दर कोसळले
मुंबईच्या भायखळा भाजी मार्केटमध्ये कालपर्यंत 130 ते 140 रुपये किलो असलेला टोमॅटो आज शंभर रुपये किलो मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. टोमॅटोचा दर इतका वाढला की, सामान्य नागरिकांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला होता.
त्याचबरोबर बाजारात टोमॅटो विकत घेण्यास आलेल्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी पाहायला मिळत होती. मात्र आज नाशिक, पुणेसह, मुंबईत मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झाल्याने टोमॅटोचे दर कोसळले आहेत. कालपर्यंत मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये 140 रुपये दर असलेल्या टोमॅटो आज शंभर रुपये किलोने विकला जात आहे.
हे सुद्धा वाचा
मार्केट परिसरात ग्राहकांमध्ये समाधानकारक वातावरण दिसून येत असून कालपर्यंत मुंबईच्या भायखळा मार्केट परिसरात 35 ट्रक टोमॅटो भरून येत होते. मात्र आता टोमॅटोची आवक जास्त झाल्याने 50 ते 55 गाड्या मार्केट परिसरात येत असल्याची माहिती व्यापारी दिली आहे.
दरात आणखी घसरण होण्याची शक्यता
नागपूरच्या ठोक बाजारात सध्या टोमॅटोचे दर ४० ते ४५ रुपये किलो आहे. टोमॅटोची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाल्याची माहिती व्यापारी देत आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ८० रुपये किलोवर आले आहेत. येत्या काळात टोमॅटोच्या दरात आणखी घसरतील. १५ दिवसांपूर्वी २०० रुपये किलो असलेले टोमॅटो आज ४० ते ४५ रुपयांवर मिळत असल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा आहे.
Web Title – Tomato Rate Today : टोमॅटोच्या 50 ते 55 गाड्या मुंबईच्या मार्केटमध्ये, जाणून घ्या आजचे दर – Marathi News | Mumbai byculla market tomato rate decreased Tomato Rate Today Mumbai pune nashik nagpur