मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

PM Kisan | या दिवशी खात्यात येईल पीएम किसान योजनेचा पैसा, ही आहे अपडेट – Marathi News | Farmers will soon have Lakshmi Darshan, and the installment of the Farmers Samman Nidhi Yojana will be deposited at this time PM Kisan Scheme

नवी दिल्ली | 23 नोव्हेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनाचा हप्ता जमा केला. पंतप्रधान झारखंड दौऱ्यावर होते. त्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये जमा केले. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना e-kyc पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या योजनेतून बाहेर फेकले गेले आहेत. आता या योजनेचा 16 वा हप्ता या दिवशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

कसा मिळतो फायदा

ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. यापूर्वी केंद्र सरकारने या 27 जुलै रोजी 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. म्हणजे प्रत्येक हप्त्यात जवळपास पाच महिन्यांचे अंतर असल्याचे दिसून येते. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये जमा केले. यापूर्वी DBT माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली.

हे वाचलंत का? -  ...तर नाही भाग घेता येणार बैलगाडा शर्यतीत, काय आली नवीन अपडेट - Marathi News | Ear Tag to Bull Big update of bullock cart race, if you can't feel the thrill, you have to do this work first to participate, new rules have come

हे सुद्धा वाचा



मग 16 वा हप्ता कधी होणार जमा?

या योजनेनुसार प्रत्येक चार महिन्यात दोन हजारांची रक्कम जमा होते. 15 वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता. त्यानुसार, 16 वा हप्ता फेब्रुवारी ते मार्च या काळात जमा होण्याची शक्यता आहे. अजून याविषयीचा खुलासा केंद्र सरकारने केला नाही. हा हप्ता या कालावधीत जमा होऊ शकतो. या वर्षातील तीन ही हप्ता जमा करण्यात आलेले आहे.

असे करा ई-केवायसी

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ekyc न केल्यास 16 वा हप्ता थांबविण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला हे काम त्वरीत करावे लागेल. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ते अपडेट करावे लागेल. तसेच CSC केंद्रावर जाऊन ही माहिती अपडेट करता येईल. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा हप्ता जमा होणार नाही.

हे वाचलंत का? -  dasara 2023 | झेंडूच्या फुलांनी आणले शेतकऱ्यांसमोर संकट...काय आहेत दर - Marathi News | Marigold flower price Fall, Farmers in trouble marathi news

या शेतकऱ्यांना नाही मिळत लाभ

ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही. इनकम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.

योजनेसाठी असा करा अर्ज

  • pmkisan.gov.in या साईटवर जाऊन योजनेचा लाभ घेता येईल
  • ‘किसान कॉर्नर’ पर्यायावर क्लिक करा
  • ‘न्यू किसान रजिस्ट्रेशन’ हा पर्याय निवडा
  • तुमचे शहर अथवा गावाची निवड करा
  • आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आणि राज्याची निवड करा
  • ‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा
  • ओटीपी नोंदवून नोंदणीची पुढील प्रक्रिया करा
  • नाव, राज्य, जिल्हा, बँक आणि आधारचा तपशील अशी सर्व माहिती भरा
  • आधार प्रामाणिकरण करुन अर्ज जमा करा
  • शेतीसंबंधीची माहिती जमा करा
  • सेव्ह बटणावर क्लिक करा
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल
हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांनो या तारखे दरम्यान परतीच्या पावसाचा तडाखा.. या भागांना पाऊस झोडपणार!


Web Title – PM Kisan | या दिवशी खात्यात येईल पीएम किसान योजनेचा पैसा, ही आहे अपडेट – Marathi News | Farmers will soon have Lakshmi Darshan, and the installment of the Farmers Samman Nidhi Yojana will be deposited at this time PM Kisan Scheme

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj