नवी दिल्ली, दि.22 डिसेंबर | एखाद्या कारची किंमत दहा कोटी असेल तर तुम्हाला विश्वास बसेल. परंतु एखाद्या घोड्याची नव्हे तर रेड्याची किंमत दहा कोटी सांगितली तर…तुम्हाला आश्चर्य वाटेल. सध्या दहा कोटींच्या गोलू 2 रेड्याची चर्चा शेतकरी वर्गात नाही तर सर्वसामान्यांमध्येही सुरु आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये सुरु असलेल्या शेतकरी मेळाव्यात हा रेडा आला आहे. त्याला पाहण्यासाठी चांगली गर्दी होत आहे. दहा कोटी रुपये किंमतीचा हा रेडा महिन्याला 60 हजार रुपयांचा आहार फस्त करतो. काजू-बदामही खातो. हरियाणातील शेतकरी पद्मश्री नरेंद्र सिंह यांचा हा रेडा आहे. या रेड्याचे नाव गोलू 2 आहे. परंतु नरेंद्र सिंह त्याला घोल्लू बोलवतात. नरेंद्र सिंह यांच्या घरात गोलू रेड्याची ही तिसरी पिढी आहे.
वर्षभरात करतो 25 लाखांची कामाई
गोलू 2 रेड्याचे आजोबांचे नाव गोलू होते. त्यानंतर त्याचा मुलगा गोलू 1 नरेंद्रसिंह यांच्या घरात आला. आता गोलू 2 आहे. गोली 2 वर्षभरात २५ लाखांची कामाई करतो. त्याचे वीर्य विकून ही कमाई होते. नरेंद्रसिंह दोन दिवस गोलूसोबत पटण्यात राहणार आहे. गोलू-2 नरेंद्र सिंह हा नरेंद्र सिंह यांचे सर्व इशारे समजतो. गोलूची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते.
हे सुद्धा वाचा
गोलू खोत काजू-बदाम
दहा कोटींचा गोलू याचे खाद्यही वेगळे आहे. त्याला खाद्यात रोज ड्राय फ्रूट म्हणजे काजू-बदाम दिले जातात. 35 किलो चारा, हरबरे, रोज सात ते आठ किलो गुळ, कधी कधी तूप आणि दूधही गोलूला दिले जाते. त्याचे वजन 15 क्विंटल आहे. उंची साडेपाच फूट आहे. रुंदी तीन फूट आहे. गोलू-2 चे वय 6 वर्ष आहे. रेड्यांचे आयुष्य जवळपास वीस वर्ष असते. त्यामुळे नरेंद्र सिंह यांना त्याची अजून चौदा वर्षे त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याच्या जेवणावर महिन्याचा खर्च 60 हजार आहे. गोली यापूर्वी अनेक शेतकरी मेळाव्यात आला आहे. त्याला पाहण्यासाठी सर्वच मेळाव्यात गर्दी होत असते. गोली सोबत अनेक जण फोटो आणि सेल्फीही काढत असतात.
Web Title – दहा कोटींची ही कार नव्हे, हा आहे काजू-बदाम खाणारा रेडा…पाहण्यासाठी गर्दीत होणारच – Marathi News | Golu 2 buffalo of ten crores entered the Patna farmers melava marathi news