मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय – Marathi News | Mumbai CM Eknath Shinde State governments relief to farmers compensation for crop damages limit increased Latest Marathi News

विनायक डावरूंग, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 02 जानेवारी 2024 : जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी… राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. कधी जून-जुलैमध्ये होणाऱ्या जास्तीच्या पावसामुळे तर कधी अवकाळी पावसामुळे शेतीचं- पीकांचं मोठं नुकसान होतं. यासाठी आधी सरकारकडून जी मदत दिली जायची ती आता आली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पीक नुकसान झाल्यानंतर मदतीची मर्यादा वाढवली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषापेक्षा जास्त मदतीचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. शासनाने एसडीआरएफ नियमात बदल करून प्रति हेक्टर मदत वाढण्याचा आदेश काढला आहे.

तुमची जमीन जर बागायती असेल तर तुमच्या पीकांच्या नुकसानीसाठी सरकारने तरतूद केली आहे. बागायती पीकांच्या नुकसानीसाठी आधी प्रति हेक्टरी 17 हजार रूपये नुकसान भरपाई दिली जात होती. आता ती वाढवण्यात आलाी आहे. 27 हजार प्रतिहेक्टर ही मदत सरकार देणार आहे. ही नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे.

हे वाचलंत का? -  today forecast : कोकणात मुसळधार पावसाचा जोर वाढला, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Maharashtra rain update today kokan declared yello alert

जिरायती जमीन जर तुम्ही पीक घेतलं असेल. त्या पिकाचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असेल. तर तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. आधी प्रति हेक्टरी मर्यादा 8 हजार रूपये मदत शेतकऱ्यांना मिळत होती. आता ती 13 हजार पाचशेपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. ही मर्यादा दोन हेटक्टर पर्यंत असणार आहे.

बहुवार्षिक पीक नुकसान झालं असेल. तर त्यासाठी आधी प्रति हेक्टरी 22 हजार 500 रूपये मदत सरकारकडून दिली जायची ती आता वाढवली गेली आहे. आता 36 हजार प्रति हेक्टर अशी ही मदत दिली जाणार आहे. 3 हेक्टरपर्यंतच्या नुकसानासाठी ही मदत दिली जाईल.

हे वाचलंत का? -  राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, मदतीसाठी केंद्राला आवाहन - Marathi News | Drought declared in 40 talukas of the state, appeal to center for help, Chief Minister Eknath Shinde's decision

बातमी अपडेट होत आहे.


Web Title – अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय – Marathi News | Mumbai CM Eknath Shinde State governments relief to farmers compensation for crop damages limit increased Latest Marathi News

हे वाचलंत का? -  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिलासा काय?; विधानसभेत घोषणांचा पाऊस - Marathi News | Chief Minister Eknath Shinde made these announcements in the Legislative Assembly for the loss affected farmers

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj