मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Pension | नोकरदारच नाही तर शेतकऱ्यांना पण पेन्शन! सरकार स्वतः देते गॅरंटी – Marathi News | PM Kisan Mandhan Yojana, Pradhan Mantri Sharm Yogi Maan Dhan Yojana the farmer gets the pension benefits, takes advantage

नवी दिल्ली | 18 जानेवारी 2024 : आयुष्याची संध्याकाळ आरामात जावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांना वाटते नोकरदारांनाच उतारवयात पेन्शनचा लाभ मिळतो. पण तसो नाही. कष्टकरी वर्ग, मजूर, शेतकरी यांना सुद्धा पेन्शन मिळते. त्यासाठी केंद्र सरकारने योजना सुरु केल्या आहेत. त्याआधारे तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करु शकता. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु केली आहे. पंतप्रधान शेतकरी मानधन योजना आणि पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना या योजना किसान पेन्शन योजना म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 60 व्या वर्षानंतर पेन्शनचा लाभ मिळतो.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

केंद्र सरकारने 31 मे 2019 रोजी देशातील शेतकऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ सुरु केली. शेतकरी पेन्शन योजनेतंर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन देण्यात येते. एका वर्षात 36,000 रुपये या योजनेतंर्गत मिळतात. या योजनेतंर्गत आतापर्यंत 4 कोटी 9 लाख 76 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ ही योजना राबवते.

हे वाचलंत का? -  राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हा अभ्यासक्रम, शाळा बंद बाबत शिक्षणमंत्री म्हणतात... - Marathi News | Griculture Education in Maharashtra from first standard minister Deepak Kesarkar informed marathi news

हे सुद्धा वाचा

असा घ्या फायदा

  1. केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. पीएम किसान सम्मान योजनेतंर्गत ही मदत करण्यात येते. शेतकरी सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात. जे शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना या योजनेतंर्गत पेन्शनसाठी अर्ज करता येतो.
  2. या योजनेतंर्गत 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणत्याही शेतकऱ्याला त्याची नोंदणी करता येते. या योजनेत पेन्शनचा लाभ केवल पती-पत्नीलाच मिळतो. पेन्शनची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते.

किती भरावा लागतो हप्ता

पीएम किसान पेन्शन योजनेसाठी वयानुसार हप्ता जमा करावा लागतो. ही रक्कम 55 ते 200 रुपये प्रति महिन्यापर्यंत असते. 18 वर्षाच्या या योजनेत नोंदणी करण्यासाठी केवळ 55 रुपये जमा करावे लागतात. 20 वर्षाच्या वयात प्रीमियमची रक्कम 61 रुपये आणि 40 व्या वर्षी ही रक्कम 200 रुपये महिना होते. या योजनेत जितकी रक्कम शेतकरी जमा करतात, तेवढीच रक्कम केंद्र सरकार जमा करते.

हे वाचलंत का? -  मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किमती आल्या समोर, आता एवढ्या लाखात घ्या म्हाडाचे घर, पहा घरांच्या किमती..!

ही द्या कागदपत्रे

  • 2 हेक्टर जमीन असणारे शेतकरी पात्र
  • तेच या योजनेसाठी अर्ज करु शकतात
  • आधारकार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक
  • वयाचा दाखला आणि शेतीचे खासरा पत्र
  • सरकारी बँक, सेवा केंद्रात योजनेची मिळले माहिती
  • https://maandhan.in या साईटवर सविस्तर माहिती


Web Title – Pension | नोकरदारच नाही तर शेतकऱ्यांना पण पेन्शन! सरकार स्वतः देते गॅरंटी – Marathi News | PM Kisan Mandhan Yojana, Pradhan Mantri Sharm Yogi Maan Dhan Yojana the farmer gets the pension benefits, takes advantage

हे वाचलंत का? -  सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी तब्बल एवढी आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार..

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj