मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

चक्क आता कांद्याची तस्करी, बॉक्स डाळिंब अन् टोमॅटोचा, परंतु आतामध्ये कांदा, Video व्हायरल – Marathi News | Onion smuggling from Nashik, Nagpur city marathi news

उमेश पारीक, लासलगाव, नाशिक, नागपूर दि. 17 फेब्रुवारी 2024 | कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 7 डिसेंबरला कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. यामुळे देशांतर्गत मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्याने कांद्याचे बाजार भाव चार हजार रुपयांवरून एक हजार रुपये प्रतिक्विंटल झाले. यामुळे कांद्याचा उत्पादन खर्चही निघणे शेतकऱ्यांसाठी अवघड झाले. परंतु कांदा निर्यात बंदीचा फायदा व्यापारी आणि कांद्याची तस्करी करणाऱ्यांना होत आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक हजार रुपये प्रति क्विंटलच्या कांद्यामागे दहा हजार रुपयांपर्यंत कमवत असल्याचे समोर आले आहे. डाळिंबाच्या पेट्यांमध्ये कांदा भरून बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या देशांमध्ये पाठवला जात आहे.

डाळिंबा बॉक्समध्ये कांदा

केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी कांद्याची निर्यात बंदी केल्यानंतर देशांतर्गत कांद्याचे सरासरी बाजार भाव 900 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल खाली आले. परंतु विदेशात कांद्याला शंभर ते दीडशे रुपये किलो म्हणजे दहा हजार ते पंधरा हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत आहे. यामुळे डाळिंबाच्या बॉक्समध्ये तर कधी टोमॅटोच्या बॉक्समधून कांद्याची तस्करी सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या कांदा तस्करांवर कठोर कारवाई केली जाणार का असा ही सवाल उपस्थित केला जात आहे.

हे वाचलंत का? -  Dragon Fruit : ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी; शेतकरी झाला मालामाल, 1 एकरात उत्पन्न इतके लाख - Marathi News | Successful experiment of dragon fruit farming by Bajirao Datkhile farmer from Dharashiv Bhoom Pimpalgaon, income nearabout 12 lakh

हे सुद्धा वाचा



नागपूरमध्ये तस्करी पकडली

टोमॅटोच्या नावाखाली कांद्याची परदेशात तस्करी होत असल्याचा प्रकार नागपूरमधून समोर आला आहे. 82.93 मॅट्रिक टन कांदा टोमॅटोच्या कंटेनरमध्ये लपवून परदेशात पाठवण्यात येत होता. कांदा निर्यातबंदी असताना हा कांदा युएईला पाठवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती सीमा शुल्क विभागाच्या नागपूर युनिटला मिळाली होती.

हे वाचलंत का? -  PM Kisan Yojana : अजून पण नाही मिळाला 18 वा हप्ता? मग येथे थेट करा तक्रार - Marathi News | PM Kisan Yojana, Still not received 18th installment? not credit 2000 rupees on your bank account Then complain directly here

नाशिकच्या दोन निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये टोमॅटो पेट्यांमागे कांदा पॅक करून UAE ला पाठवित असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या नागपूरच्या टीमने मुंबईला जाऊन कंटेनरची तपासणी केली. तेव्हा कंटेनरच्या समोरच्या भागांमध्ये टोमॅटोचे बॉक्स होते व त्यामागे कांद्याच्या पोती लपवून तो UAE ला पाठवण्यात येत असल्याचे आढळून आले.

हे वाचलंत का? -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 'या' योजनेसाठी 35 हजार कोटी मंजूर; जाणून घ्या योजनेचं नाव - Marathi News | Prime Minister's PM ASHA scheme for farmers, 35 thousand crores approved



Web Title – चक्क आता कांद्याची तस्करी, बॉक्स डाळिंब अन् टोमॅटोचा, परंतु आतामध्ये कांदा, Video व्हायरल – Marathi News | Onion smuggling from Nashik, Nagpur city marathi news

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj