मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

PM Kisan : निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; पीएम किसानचा या दिवशी जमा होणार 17 वा हप्ता – Marathi News | PM Kisan Samman Nidhi Yojana 17th installment of PM Kisan coming on this date in May; E KYC Bank Account Aadhaar Linked Other Update Lok Sabha Election 2024

आली आनंदवार्ता, कधी होणार पीएम किसानचा हप्ता

लहरी हवामानामुळे मागील आणि या वर्षातही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेले पीक गेले. सध्या लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 17 वा हप्ता जमा होणार आहे. एका अंदाजानुसार, पीएम-किसान योजनेचा 17 वा हप्ता मे महिन्याचा अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. या योजनेतंर्गत वार्षिक 6,000 रुपये जमा होतात. प्रत्येक चार महिन्यात 2000 रुपये जमा करण्यात येतात.

फेब्रुवारीत 16 वा हप्ता जमा

  • या योजनेचा 16 वा हप्ता या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमा केला होता. यवतमाळ-नागपूर रस्त्यावरील भारी येथे त्यांचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्यांनी हा पैसा हस्तांतरीत केला. 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 21,000 कोटी रुपये या योजनेतंर्गत जमा करण्यात आले होते.
  • मोदी सरकारने 2019 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्वी पीएम किसान योजनेची घोषणा केली होती. मार्च महिन्यात पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्त्यांच्या माध्यमातून 2.8 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी जमा करण्यात आला होता.
हे वाचलंत का? -  शेतकर्‍यांनो! लगेच मिळणार 3 लाख रुपये लोन; येथे पहा कसे मिळणार लोन..!

योजनेसाठी असा करा अर्ज

हे सुद्धा वाचा

  • pmkisan.gov.in या साईटवर जाऊन योजनेचा लाभ घेता येईल
  • ‘किसान कॉर्नर’ पर्यायावर क्लिक करा
  • ‘न्यू किसान रजिस्ट्रेशन’ हा पर्याय निवडा
  • तुमचे शहर अथवा गावाची निवड करा
  • आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आणि राज्याची निवड करा
  • ‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा
  • ओटीपी नोंदवून नोंदणीची पुढील प्रक्रिया करा
  • नाव, राज्य, जिल्हा, बँक आणि आधारचा तपशील अशी सर्व माहिती भरा
  • आधार प्रामाणिकरण करुन अर्ज जमा करा
  • शेतीसंबंधीची माहिती जमा करा
  • सेव्ह बटणावर क्लिक करा
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल

ही चार कामे आताच झटपट करा

  • आधार क्रमांकासह बँक खाते नोंदणी झाले की नाही ते तपासा
  • बँक खाते NPCI सोबत संलग्न असणे आवश्यक
  • केवायसी तपशील पूर्ण करणे आवश्यक आहे
  • भू-सत्यापन, तुमच्या शेतीविषयक दस्तवेजांचे सत्यापन आवश्यक आहे
  • तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते पण तपासा

असे करा eKYC

  1. ओटीपी आधारे करा ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल ऐपवर उपलब्ध)
  2. बायोमेट्रिक आधारे ई-केवायसी तुम्ही CSC Center/ SSK वरुन करु शकता
  3. फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी, मोबाईल ऐपवर उपलब्ध आहे.
हे वाचलंत का? -  डाळिंब बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड, त्याने केलेल्या युक्तीचे होते सर्वत्र कौतुक - Marathi News | Donation of clothing on pomegranate orchards to protect from heat

पैसे जमा झाले की नाही ते असे तपासा

  • सर्वात अगोदर पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
  • या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
  • या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
  • आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
  • त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल.
हे वाचलंत का? -  स्वस्त प्रॉपर्टीचा लिलाव; स्वस्तात घर, दुकान आणि प्लॉट घेण्याची मोठी संधी, येथे पहा सर्व माहिती..!

या क्रमांकावर करा कॉल

  1. पीएक किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
  2. पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401
  3. पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266
  4. पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606
  5. 14व्या हप्त्याबाबत अडचण असल्यास : 011-24300606

या ई-मेलवर करा तक्रार

पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची चौकशी करा. तुम्ही याविषयीची तक्रार ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधा. तसेच शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल.


Web Title – PM Kisan : निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; पीएम किसानचा या दिवशी जमा होणार 17 वा हप्ता – Marathi News | PM Kisan Samman Nidhi Yojana 17th installment of PM Kisan coming on this date in May; E KYC Bank Account Aadhaar Linked Other Update Lok Sabha Election 2024

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj