मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

भारतीय कापसाला जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त करून देणार कस्तुरी कॉटन – Marathi News | Kasturi cotton will make Indian cotton globally important

जागतिक व्यापारात भारत हा एक अग्रणी कापूस उत्पादक देश म्हणून मान्यताप्राप्त आहे. फार पूर्वीपासून, भारताने जगाला सहज श्वास घेण्याची योग कला, ज्ञानसंवर्धनाचा आत्मिक मार्ग आणि कापसाच्या शुद्धतेचे सार या नाविन्यपूर्ण विज्ञानाद्वारे संपूर्ण जगाच्या वस्त्रोद्योगाच्या वारशात महत्त्वाचे योगदान दिले आहे. भारतीय कापसाला एका नवीन उंचीवर नेणाऱ्या आणि भारताच्या कापसाच्या समृद्ध वारशात खोलवर मूळे रूजलेला एक अस्सल जागतिक ब्रँड असलेल्या कस्तुरी कॉटनच्या माध्यमातून भारताने या वारशाच्या कहाणीचा एक नवीन अध्याय सुरू केला आहे.

भारतातील कापसाची कहाणी

भारतीय कापसाची कथा ही नाविन्यता आणि परंपरा यांनी समृद्ध अशी एक कहाणी आहे. गेली अनेक शतके आपल्या शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत केली आणि गुणवत्ता व शुद्धता यासाठी प्रसिद्ध असलेल्या कापसाची लागवड केली. १३व्या शतकात प्रसिद्ध व्हेनेशियन व्यापारी, संशोधक प्रवासी आणि लेखक मार्को पोलो यांनी भारताला भेट दिली. अतिशय मुलायम बोंडे असलेली कापसाची झाडे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. ह्या कापसाच्या बोंडांद्वारे सर्वाधिक तलम सूत अशा कापडाची निर्मिती करुन जगाला मंत्रमुग्ध केले. कस्तुरी कॉटनच्या माध्यमातून ह्या गुणवत्तेचे संघटन करून भारतातील सर्वोत्तम कापसाचे उदाहरण ठरेल अशा एका ब्रँडमध्ये रूपांतर करणे हे आमचे ध्येय आहे. भारत सरकार, वस्त्रोद्योग मंडळे आणि उद्योग समूह यांच्या संघटित प्रयत्नांतून साकार केला जाणारा हा उपक्रम म्हणजे संपूर्ण कापूस मूल्य श्रृंखलेत सर्वोत्कृष्टता आणि शाश्वतता यांच्या बांधिलकीचे प्रतिक असेल. परंपरा आणि प्रगती यांचा मिलाफ करताना आम्ही केवळ कापसाच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित न करता एक असा चिरस्थायी वारसा निर्माण करु ज्यामूळे भारतीय कापसाचा परंपरागत ठसा जागतिक व्यासपीठावर ठसठसीतपणे उमटेल.

हे वाचलंत का? -  M. S. Swaminathan : शेतकऱ्यांना बळ देणारा MSP अन् 'तो' फॉर्म्युला; स्वामिनाथन अहवाल नेमका काय आहे? - Marathi News | Mumbai M S Swaminathan Passed Away Harit Kranti swaminathan aayog report Farmer Marathi News

नवी उद्दिष्टे नव्या परिमाणांचे निश्चीतीकरण

कस्तुरी कॉटन हे कापसाच्या गुणवत्तेबाबतचे एक नवे परिमाण आहे. सर्वाधिक कापूस उत्पादक देशातील एक प्रीमियम ब्रँड म्हणून कस्तुरी कॉटनला प्रसिद्धी देणे आणि गुणवत्तेशी संबंधीत प्रमुख निकषांनी परिपूर्ण असलेल्या कापसाचा नियमित पुरवठा करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सर्व प्रक्रियांचा मागोवा घेण्यास सक्षम असलेल्या ट्रेसेबिलिटीच्या माध्यमातून आणि प्रमाणिकरणाद्वारे आम्ही अस्सलपणाची काळजी घेतो आणि त्याद्वारे ब्रँडची विश्वासाहर्ता निर्माण करतो, ज्याचा या उद्योगात सहभागी असलेल्या सर्व भागधारकांना फायदा होतो.

उपक्रमाचे नेतृत्व

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) आणि वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने कॉटन टेक्सटाइल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (टेक्सप्रोसिल) द्वारा कस्तुरी कॉटनचे ब्रँडिंग, ट्रेसेबिलिटी आणि प्रमाणिकरण यांची अंमलबजावणी करण्याचे काम केले जात आहे. 1954 मध्ये स्थापना करण्यात आलेल्या टेक्सप्रोसिल ही संस्था, संपूर्ण जगात भारतीय कापूस व कापड उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 1970 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सीसीआय द्वारा कापूस उत्पादक शेतकरी आणि वस्त्रोद्योग यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची कामे केली जातात.

कस्तुरी कॉटनचे वचन

कस्तुरी कॉटन द्वारे आम्ही मुलायम, चमकदार, मजबुती, सुखद अनुभव, शुद्धता आणि शुभ्रता यासारखे मूर्त फायदे देणारे गुणवत्तेचे एक परिमाण निश्चित करतो. उच्च गुणवत्तेच्या मानकांचे पालन करून, कस्तुरी कॉटन कापडांचा मुलायमपणा, मजबुती आणि टिकाऊपणा यात वाढ करते व त्याचबरोबर रंगाची चमक सुधारते. संपूर्ण मूल्य शृंखलेत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात बनविण्यात आलेल्या, कस्तुरी कॉटनचा प्रत्येक धागा, अस्सलपणा, वैविध्यता आणि ट्रेसेबल असल्याचा विश्वास देतो.

हे वाचलंत का? -  मुंबईकरांनो! यादी आली; म्हाडा लॉटरीच्या अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध..!

कस्तुरी कॉटन वापरण्याचे फायदे

गुणवत्ता आणि ट्रेसेबिलिटी याच्या पलीकडेही कस्तुरी कॉटनचे अनेक फायदे आहेत. कस्तुरी कॉटनची निवड करून, उत्पादक आणि ब्रँड-धारक उच्च-गुणवत्तेच्या कापसाची जागतिक मागणी पूर्ण करू शकतात आणि संपूर्ण जगात भारतीय कापसाची प्रतिष्ठा वाढवू शकतात. कस्तुरी ब्रँडशी निगडित असलेल्या प्रत्येक अधिमूल्याद्वारे प्रत्येक धाग्याची सर्वोत्तम गुणवत्ता आणि कलाकारी दिसून येते, ज्यामुळे संपूर्ण वस्त्रोद्योगातील संबंधितांसाठी ती एक फायदेशीर गुंतवणूक ठरते.

कस्तुरी कॉटन उपक्रम हे भारतीय कापसाला जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे एक धाडसी पाऊल आहे. कापूस मूल्य श्रृंखलेतील सर्व संबंधितांना एकत्र करून, तसेच गुणवत्ता आणि ट्रेसेबिलिटी सोबत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून, पुढे अनेक पिढ्यांसाठी उत्कृष्टतेचे आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून कस्तुरी कॉटनला स्थान मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ह्या संपूर्ण प्रवासात, आपल्या देशाच्या इतिहास जोपासताना विश्वाच्या उज्वल भविष्याकरीता, भारताने विणलेला कापसाचा समृद्ध वारसा आणि कालातीत परंपरा यांचा महोत्सव साजरा करूया.

हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! या तारखेला होणार कापूस, सोयाबीन अनुदानाचे वितरण..


Web Title – भारतीय कापसाला जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त करून देणार कस्तुरी कॉटन – Marathi News | Kasturi cotton will make Indian cotton globally important

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj