मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

शेतकऱ्याचा नाद करायचा नाही; 21 लाखांना खरेदी केला ‘किटली’ – Marathi News | Pune Khed Taluka Farmer buy Kittle OX, Bull 21 lakhs Desire has no value; The discussion of this farmer , ‘Kettle’ was bought for 21 lakhs

हौशेला काही मोल नाही अस म्हटलं जातं. मात्र हीच हौस पुरविण्यासाठी पुण्याच्या खेड तालुक्यातील एका शेतकऱ्याने तब्बल 21 लाख रुपये मोजले आहे. ऑटो बाजारात आलिशान कार घ्यायची म्हटली तर 20 लाखांपेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागते. येथे या तर या शेतकऱ्याने 21 लाख रुपये देऊन ‘किटली’ खरेदी केला. तुम्ही म्हणाल आता हा किटली आहे तरी काय, तर मंडळी हा किटली नावाचा बैल आहे. शेतकऱ्याने या किटलीसाठी इतकी मोठी रक्कम मोजली आहे. या महागड्या किटली बैलाला पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे.

एक बैल 21 लाखांना

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर बैलाच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. सध्या ग्रामीण भागातील अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या बैलगाडा शर्यतीमुळे सर्वत्र पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे. खेड तालुक्यातील पाचारणेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाचारणे यांनी तब्बल 21 लाखांना एका बैलाची खरेदी केली आहे. एखाद्या आलिशान कारच्या किंमती इतकीच किंमत त्यांनी मोजली आहे.पाचारणे यांनी या बैलाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. त्यांनी या बैलाचे स्वागत केले. सध्या या बैलाला पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहेत.

हे वाचलंत का? -  पावसाअभावी बळीराजा हतबल, महिनाभरापासून पाऊस गायब झाल्यामुळे... - Marathi News | The drought situation in maharashtra Rain update farmer crop agricultural news

हे सुद्धा वाचा

बैल बाजारात लाखोंची उलाढाल

बैलगाडा शर्यत सुरु झाल्यामुळं जिल्ह्यातील बैल बाजारही गजबजू लागले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या बैल खरेदी विक्री बाजारात पुन्हा एकदा लाखो रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलांची विक्री करण्यासाठी शेतकरी येत आहेत. अश्याच प्रकारे खेड तालुक्यातील पाचारने वाडी येथील शेतकऱ्याने शर्यती मध्ये धावणाऱ्या बैलाची 21 लाखांना खरेदी केली आहे.

इअर टॅग आवश्यक

हे वाचलंत का? -  PM Kisan चा पैसा खात्यात जमा होणार की नाही? एका क्लिकवर जाणून घ्या - Marathi News | PM Kisan Yojana money will be deposited in the account or not? Find out in one click on status

इअर टॅग एक बारकोड पद्धती आहे, जी सॉफ्टवेअर मध्ये डेव्हलप केलेली आहे. त्याची नोंद भारत सरकारकडे असते. बाजार समिती, आठवडी बाजार खरेदी विक्री संघ, यांनी इतर पशुधनाची ही विक्री करताना हा इअर टॅग दिला आहे का नाही यावर लक्ष द्यावे लागणार आहे. नसेल तर अशा विक्रीवर बंदी घालावी, असा शासन आदेश आला आहे. तेव्हा बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यापूर्वी इअर टॅगिंग जरुर करुन घ्या.


Web Title – शेतकऱ्याचा नाद करायचा नाही; 21 लाखांना खरेदी केला ‘किटली’ – Marathi News | Pune Khed Taluka Farmer buy Kittle OX, Bull 21 lakhs Desire has no value; The discussion of this farmer , ‘Kettle’ was bought for 21 lakhs

हे वाचलंत का? -  कर्जमाफीच्या नव्या यादीतून “हे” शेतकरी अपात्र? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj