मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

ही कोंबडी वर्षाला देते 200 अंड्यांची गॅरंटी, मांस देखील चविष्ठ, कुक्कुटपालनासाठी वरदान – Marathi News | Cari Nirbheek chickens guarantee 200 eggs per year, profitable for poultry farming

भारतात कुक्कुट पालनाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक कोंबडी चांगलीच फायदेशीर ठरणारी आहे. या कोंबडीचे पालन केल्यास उत्तम फायदा होण्याची गॅरंटी आहे. बेरोजगार तरुणांना कुक्कुट पालनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून ( Kukut Palan Yojana Maharashtra ) बॅंकेचे कर्ज मिळत असते. त्यामुळे ज्यांना कमी भांडवलात कुक्कुट पालनाचा व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी ही कोंबडी चक्क वरदान ठरणारी आहे. कुक्कुट पालनाचा व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी जशी बॉयलर कोंबडी उपयोगी ठरते तशी कॅरी निर्भीक ( Cari-Nirbheek ) नावाच्या जातीची कोंबडी एकदम फायद्याची ठरते. काय आहे या कोंबडीचे वैशिष्टये पाहूयात….

भारतात अंडी आणि कोंबडी मांसाची मागणी वाढत आहे. त्यामुळे कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांसाठी उत्तम जोडधंदा ठरत आहे. पोल्ट्री फार्म टाकणे हा कमी भांडवलात मोठी कमाई करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. वाढती लोकसंख्या आणि कमी होत असलेला रोजगार यामुळे आजकाल तरुण शेतीबरोबरच आता पशुपालन व्यवसाय जोडधंडा स्वीकारत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कुक्कुट पालनात अंडी आणि मांस अशा दोन्ही प्रकारचे उत्पन्न मिळते. आणि जागाही फारशी लागत नाही. रोजगाराच्या शोधात असलेले बेरोजगार तरुण आता कुक्कुट पालनाकडे वळले आहेत.

हे वाचलंत का? -  पंजाब डख यांचा नवीन अंदाज आला.. या भागात पडणार जोरदार पाऊस Panjab dakh navin andaj

कोंबड्यांमध्येही अनेक प्रकारच्या जाती आढळतात. ज्या त्यांच्या गुणवत्तेसाठी ओळखले जातात. यापैकी एक कोंबडीची जात आहे ती म्हणजे कॅरी निर्भीक जात होय. या कोंबडीचे मांस उत्तम दर्जाचे असते. आणि अंड्यांच्या पैदास करण्यासाठी ही कोंबडी इतर कोंबड्यापेक्षा वरचढ आहे. कोंबडीच्या या खास जातीचे पालनपोषण करून कुक्कुटपालन करणारे लघु उद्योजक चांगला नफा कमवू शकतात. चला मग पाहूयात कुक्कुट प्राणी तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात या भन्नाट अंडी देणाऱ्या कोंबडीच्या या खास जातीबद्दल..,

20 आठवड्यांत तयार होते

कॅरी निर्भिक ही कोंबडीची एक देशी जात आहे, जिचे मांस प्रथिने गुणधर्मांनी समृद्ध आहे. ही कोंबडी अतिशय चपळ असते, आकाराने मोठी, ताकदवान, दिसायला देखणी, स्वभावाने लढाऊ आणि मजबूत प्रतिकार शक्तीची असते. सुमारे 20 आठवड्यांच्या आतच या कोंबड्यांचे वजन 1847 ग्रॅमपर्यंत पोहोचते. दरवर्षी या कोंबड्या तब्बल 190 ते 200 अंडी देतात. आणि प्रत्येक अंड्यांचे वजन 45 ग्रॅम असते.  कॅरी निर्भीक कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म सुरू करून कमी खर्चात शेतकऱ्यांना दामदुप्पट नफा कमाविता येऊ शकतो असे रायबरेलीतील शिवगढ शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजित वर्मा यांनी म्हटले आहे. इंडो – जर्मन यांच्या संयुक्त प्रयत्नातून या कोंबडीची जात साल 2000 मध्ये विकसित करण्यात आली होती.

हे वाचलंत का? -  Maharashtra Farmer News : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत, 10 दिवसात पाऊस नाही पडला तर... - Marathi News | Maharashtra latest Farmer News Kharip season crop destroyed Swabhimani Shetkari Saghtana


Web Title – ही कोंबडी वर्षाला देते 200 अंड्यांची गॅरंटी, मांस देखील चविष्ठ, कुक्कुटपालनासाठी वरदान – Marathi News | Cari Nirbheek chickens guarantee 200 eggs per year, profitable for poultry farming

हे वाचलंत का? -  Loan waiver 2 lakhs: महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतच्या कर्ज माफीचा दिलासा…

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj