मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Monsoon : मान्सून संपूर्ण महाराष्ट्र किती दिवसांत व्यापणार? सध्या कुठे रेंगाळला पाऊस – Marathi News | Monsoon will reach Vidarbha in five days marathi news

मान्सून यंदा राज्यात वेळेपूर्वी दाखल झाला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात मान्सून पोहचला आहे. परंतु अजून विदर्भात मान्सून दाखल झालेला नाही. संपूर्ण राज्यात मान्सून कधी पोहचणार आहे? त्यासंदर्भात हवामान विभागाने अपडेट दिले आहे. राज्यात मान्सून पुढील पाच दिवसांत सर्वत्र दाखल होणार आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. मुंबईत आज पावसाने ऊघडीप दिली आहे. शनिवारी हवेतील आद्रता ६० टक्कांपर्यंत वाढणार आहे, उद्या पावसाची पुन्हा रिपरिप सुरु होणार आहे.

राज्यात पाच दिवसांत सर्वत्र मान्सून

राज्यात पुढील पाच दिवसांत मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे, असा अंदाज मुंबई हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे महासागराचे तापमान आणखी कमी होऊन येत्या ऑगस्टमध्ये ‘ला निना’ विकसित होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. ‘ला निना’ असताना देशात बहुतेक वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो, असे आकडेवारी सांगते. ‘ला निना’मुळे यंदा मान्सूनच्या उत्तरार्धात जास्त पावसाची शक्यता असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला आहे.

विदर्भात मान्सून दाखल होणार

येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून विदर्भात दाखल होणार आहे. सध्या मान्सूनला अनुकूल हवामान नसल्याने कोकण वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. परंतु चार पाच दिवसांत सर्वत्र पाऊस परतणार आहे.

हे वाचलंत का? -  कांद्याची निर्यातबंदी उठवताच दरात वाढ, लासलगाव बाजारात... - Marathi News | central government lifted the export ban on onions marathi news

हे सुद्धा वाचा

उत्तर भारतात मान्सून रेंगाळण्याची शक्यता

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये मान्सून लांबणार आहे. ईशान्य भारतात आणि दक्षिण भारतात मान्सून दाखल झाला आहे. मात्र उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. राजधानी दिल्लीत तापमान पोहोचले 45 अंशावर पोहचले आहे. उत्तर भारतात पाऊस झाला नाही तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

यंदा मान्सून वेळेआधीच

यंदा मान्सून अंदमान निकोबारमध्ये १९ मे रोजी त्यानंतर केरळमध्ये दोन दिवस आधीच ३० मे रोजी आला. त्यानंतर ६ जून रोजी महाराष्ट्रातील कोकणात मान्सून आला. ८ जून रोजी पुणे जिल्ह्यात मान्सून आला. त्यानंतर मराठवाड्यात देखील मान्सून आला होता. त्यापुढे मान्सूनची प्रगती सुरु होती. ९ जून रोजी मुंबईसह, ठाणे या भागात मान्सून आला. यामुळे विदर्भात मान्सून लवकरच दाखल होण्याची अपेक्षा आहे.

हे वाचलंत का? -  राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हा अभ्यासक्रम, शाळा बंद बाबत शिक्षणमंत्री म्हणतात... - Marathi News | Griculture Education in Maharashtra from first standard minister Deepak Kesarkar informed marathi news


Web Title – Monsoon : मान्सून संपूर्ण महाराष्ट्र किती दिवसांत व्यापणार? सध्या कुठे रेंगाळला पाऊस – Marathi News | Monsoon will reach Vidarbha in five days marathi news

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj