मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

जनावरांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; रिक्त पदांमुळे पशुसंवर्धन विभाग सलाईनवर, पदं भरती होणार कधी? – Marathi News | Pune Bhor Talulka Timely treatment of cattle and other animals has become difficult, the issue of animal health has become difficult, when will the vacancies be filled

जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांना रोगराईपासून वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची मदत होते. पण काही भागात रिक्त पदांमुळे हा विभागच सलाईनवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आणि गुराढोराचे मालक चिंतेत आहे. लवकरात लवकर ही रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.

इतकी पदे रिक्त

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन विभागाच्या मंजूर असलेले सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पद १ व पशुधन पर्यवेक्षक १२ पदे अशी १३ पैकी १३ पदे रिक्त आहेत. सध्या पशुधन विकास अधिकारी ही दोनच पदे कार्यरत आहेत.राज्य पशुसंवर्धन विभागाची १५ पैकी तब्बल १३ पदे रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या कार्यरत असणाऱ्या पदांकडे अतिरिक्त भार दिला असला तरी तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती व पशुधनाच्या संख्येच्या मानाने ही रिक्त पद संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

हे वाचलंत का? -  ही कोंबडी वर्षाला देते 200 अंड्यांची गॅरंटी, मांस देखील चविष्ठ, कुक्कुटपालनासाठी वरदान - Marathi News | Cari Nirbheek chickens guarantee 200 eggs per year, profitable for poultry farming

हे सुद्धा वाचा

यामुळे पशुधन पालकांची मोठी गैरसोय होत असून मॉन्सूनपूर्व लसीकरण तसेच पाऊस काळात आजारी जनावरांवर औषधोपचार कसे करावे. हा मोठा प्रश्न भोर तालुक्यातील पशुधन मालकांना पडला आहे. रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.

अशी आहे स्थिती

तालुक्यात राज्य पशुसंवर्धन विभागाचे १५ व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे ११ दवाखाने कार्यरत आहेत. दोन्ही विभाग मिळून सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक मिळून एकूण ३३ पदे मंजूर आहेत. पैकी राज्य शासनाची १३ व जिल्हा परिषदेची ३ अशी १६ पदे रिक्त आहेत. तर मंजूर २५ शिपायांपैकी १३ पदे रिक्त आहेत. तालुका लघु पशू चिकित्सालय भोर अंतर्गत येणाऱ्या भोर राजगड(वेल्हे), पुरंदर तालुक्यातील मंजूर असणाऱ्या २५ पदांपैकी पशुधन विकास अधिकारी ही फक्त दोन पदे कार्यरत आहेत.

हे वाचलंत का? -  Nashik Tomato : नाशिकमध्ये टोमॅटोचा दर उतरला, 20 किलोच्या कॅरेट्सला 1200 रुपयांचा दर, जाणून घ्या एक किलोचा दर - Marathi News | Nashik tomato rate Down Nashik Bajar Samiti central government take dision

जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

तालुक्यात विसाव्या पशुगणने नुसार गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या कोंबड्या मिळून ४२ हजार ६१७ पशुधन आहे. या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी असलेल्या अपुऱ्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त कामाच्या भारामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. पशुविकास अधिकारी, पर्यवेक्षक नसल्याने पशुधनावर वेळेत उपचार होत नाहीत. याशिवाय विविध योजनांचा लाभ घेताना देखील अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळ्यात जनावरांमध्ये आजाराचे प्रमाणही असते. आता गुरांसह अन्य पशूंवर वेळेवर उपचार मिळणे अवघड झाले असल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही दिवसांत पदभरती

शासनाकडून रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. थोड्याच दिवसांत पदे भरली जातील. सध्या रिक्त असलेल्या पदांचा कार्यभार जिल्हा परिषदेच्या पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडे देण्यात आलेला आहे अशी माहिती अतिरिक्त सहाय्यक आयुक्त डॉ. शुभांगी गावकरे यांनी दिली आहे. तर रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत जेणेकरून पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन विकास अधिकारी व पर्यवेक्षक यांच्यावरील अतिरिक्त भार कमी होईल, असे मत पशुधन विकास अधिकारी डॉ.वर्षाराणी जाधव यांनी व्यक्त केले.

हे वाचलंत का? -  बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बातमी एका क्लिकवर - Marathi News | Maharashtra farmer news agricultural news rain update draout situation


Web Title – जनावरांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; रिक्त पदांमुळे पशुसंवर्धन विभाग सलाईनवर, पदं भरती होणार कधी? – Marathi News | Pune Bhor Talulka Timely treatment of cattle and other animals has become difficult, the issue of animal health has become difficult, when will the vacancies be filled

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj