मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचे, कोकणासह या 11 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा – Marathi News | Heavy rain for next few days heavy rain warning for these 11 states including konkan

जून महिन्याच्या मध्यात मंदावलेला मान्सून जुलैमध्ये पूर्ण ताकदीने परत येणार आहे. IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. भारताच्या वायव्य आणि मध्य भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याची बातमी आहे. त्याचवेळी, तीव्र उष्णतेचा सामना करणाऱ्या उत्तर प्रदेशातमध्येही या आठवड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार कोकण आणि गोव्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पंजाब, पूर्व राजस्थान येथे 8 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हे वाचलंत का? -  Farmer News Maharashtra : मिरचीचं पीक वाचवण्यासाठी शेतकरी पाजतोय बाटलीने पाणी - Marathi News | Farmer News Maharashtra agricultural news chilli crop destroyed rain update

कुठे जोरदार पाऊस पडेल?

देशात जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पंजाब, पूर्व राजस्थानमध्ये 8 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याने गुरुवारी सांगितले. त्याचवेळी 5 जुलै रोजी पश्चिम मध्य प्रदेशात, गुरुवारी पूर्व मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. येथे 8 जुलैपर्यंत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

आयएमडीने म्हटले आहे की, ओडिशामध्ये 8 जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडू शकतो. तर बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 6 ते 8 जुलै दरम्यान असे हवामान येऊ शकते. गुरुवारी आणि शुक्रवारी बिहारमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. याशिवाय 8 जुलैपर्यंत ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हे वाचलंत का? -  Crop Insurance | पीक विम्यासाठी कृषी विभागाची अजब अट; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट - Marathi News | Farmers benefit from crop insurance only if this crop is sown; Strange order of Agriculture Department

पुढील पाच दिवसांत केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक किनारी, कोकण, गोवा, गुजरातमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, यनाम अंतर्गत कर्नाटकातही विखुरलेला पाऊस अपेक्षित आहे. या काळात मराठवाडा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, रायलसीमा, तेलंगणा येथेही विखुरलेला पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.


Web Title – पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचे, कोकणासह या 11 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा – Marathi News | Heavy rain for next few days heavy rain warning for these 11 states including konkan

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj