मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Budget 2024 : मोदी सरकार होणार शेतकऱ्यांवर मेहेरबान; अर्थसंकल्पात कास्तकारांसाठी मोठे पाऊल टाकणार, काय बदल होणार – Marathi News | Budget 2024 Farmers Modi government will remove farmers’ displeasure Big lottery to come, big step for Farmers in the budget, what changes will happen

भारत अजूनही कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जातो. भारताची अर्ध्यांहून अधिक लोकसंख्या गावखेड्यात राहते. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांपासून अल्पभूधारकांना 6 हजारांची वार्षिक मदत वगळता, इतर ठोस उपाय योजना करण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन बजेट तयार करण्याची मागणी शेतकरी, संघटनांकडून करण्यात येत आहे. मोदी सरकार या बजेटमध्ये शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करु शकते.

कृषी क्षेत्राला प्रोत्साहन

केंद्र सरकार कृषी क्षेत्रासाठी ठोस उपाय करण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोठे शेतकरी, बागायतदार, जिरायतदार, अल्पभूधारक या सर्वांसाठी अर्थसंकल्पात महत्वाची तरतूद करण्यात येऊ शकते. कर सवलतीचा मोठा निर्णय होऊ शकतो. खते, बि-बियाणे, रसायने यांच्या किंमती कमी करण्यासाठी कर कमी करण्याचा विचार करण्यात येऊ शकतो. कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना आणि सवलतींचा पाऊस पडू शकतो.

हे वाचलंत का? -  PM Kisan Yojana : अजून पण नाही मिळाला 18 वा हप्ता? मग येथे थेट करा तक्रार - Marathi News | PM Kisan Yojana, Still not received 18th installment? not credit 2000 rupees on your bank account Then complain directly here

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांना मदत करण्यासाटी सरकार गव्हाचे, तांदळाचे आणि हरभरा वर्गीय पिकांसाठी काही ठोस पाऊल टाकण्याची शक्यता आहे. बाजारात या पिकांच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांना चांगला भाव मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. बाजारात किंमती अवाक्यात ठेवण्यासाठी प्रमुख डाळी, गव्हाचा मुबलक साठ्यावर लक्ष देण्यात येईल.

पिकांची नासाडी रोखण्यावर भर

हवामानाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. पिकांची नासाडी रोखण्यावर सरकार भर देणार आहे. या बजेटमध्ये वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक्स अद्ययावत करण्यावर भर देण्यात येणार आहे. शेतकी व्यापारासाठी खास तरतूद करण्याची शक्यता आहे. कृषी माल अधिक काळ टिकून राहण्यासाठी सुद्धा उपायावर भर देण्यात येईल. नाशवंत माल लवकर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी जलद संसाधनाच्या वापरावर भर देण्यात येईल.

ताज्या आकडेवारीवर भर

कृषी बाजारातील व्यापारात पारदर्शकतेवर भर देण्यात येईल. रिअल टाईम बेसिसवर बाजारातील डेटा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी अधिक प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येईल. आयात-निर्यातीसाठी खास योजना आणण्याची शक्यता आहे. जागतिक मानांकनावर भारतीय कृषी उत्पादने आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि प्रचारतंत्रावर भर देण्यात येऊ शकतो. यासाठी निधीची तरतूद करण्यात येऊ शकते. याविषयीची माहिती सीएनबीसी आवाजने दिली आहे.

हे वाचलंत का? -  राज्यात अवकाळी, शेतकरी संकटात, अचानक आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान - Marathi News | Unseasonal rain in many places in Maharashtra, damage to agricultural crops marathi news


Web Title – Budget 2024 : मोदी सरकार होणार शेतकऱ्यांवर मेहेरबान; अर्थसंकल्पात कास्तकारांसाठी मोठे पाऊल टाकणार, काय बदल होणार – Marathi News | Budget 2024 Farmers Modi government will remove farmers’ displeasure Big lottery to come, big step for Farmers in the budget, what changes will happen

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj