मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

शेतकऱ्यांनो खुशखबर, या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात 75 टक्के पिक विम्याची रक्कम जमा… पात्र शेतकऱ्यांची यादी पहा..

Crop Insurance: नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उर्वरित 75 टक्के पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे. हा विमा खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून दिला जाईल. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना 25 टक्के पीक विमा अग्रिम म्हणून मिळाला आहे. मात्र उरलेली 75 टक्के पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे.

या शेतकऱ्यांना मिळाली उर्वरित 75 टक्के पिक विम्याची रक्कम..

इथे क्लिक करून यादी पाहा..

राज्यातील शेतकऱ्यांचे अनियमित पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींमुळे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याचा मार्ग निवडला आहे. आता या योजनेचा लाभ (Crop Insurance) शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं दिसून येत आहे. या योजनेचा लाभ राज्यामधील जवळपास सगळेच शेतकरी घेऊ शकणार आहेत.

सर्वाधिक बाधित क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल

आपल्या राज्यामधील ज्या जिल्ह्याचे सगळयात जास्त नुकसान झालेले आहे, त्यापैकी पीक विमा वितरणात सोलापूर या जिल्ह्याला प्राधान्य दिले गेले आहे. पीक विम्याचे वाटप सोलापूर जिल्ह्यात सुरू झाले असून मंगळवेढा व त्या सोबतच इतर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना अजून पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. (Crop Insurance)

हे वाचलंत का? -  अवकाळी पावसाने शेतीतील उभे पीक आडवे…निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांचे आश्रू पुसणार कोण?

पीएम किसान लाभार्थी यादीतून या शेतकऱ्यांना वगळले. बघा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ..

पीक विमा वितरण प्रक्रिया केव्हा सुरू होणार?

पिक विमा वितरण प्रक्रिया दोन टप्प्यात होते: प्रथम, रकमेच्या 25 टक्के अग्रिम रक्कम दिली जाते, त्यानंतर उर्वरित 75 टक्के रक्कम दिली जाते. ज्या भागात 21 दिवसांहून अधिक काळ पाऊस खंडित झाला आहे आणि अंतिम पैसेवारी ही 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे, या ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. सरासरी राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे आणि या सर्व जिल्ह्यांमध्ये उर्वरित 75 टक्के पीक विम्याची (Crop Insurance) रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे.

हे वाचलंत का? -  राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा देखील अंदाज - Marathi News | Unseasonal rain in Maharashtra, temperature in the state will rise above 40 degrees marathi news

केंद्र सरकारच्या 30 एप्रिल 2024 च्या जाचक परिपत्रकाच्या विरोधात राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करत असल्याचे निवेदन राज्य तक्रार निवारण समितीकडे सादर करण्यात आले आहे.

अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ₹6000 जमा.. बघा लाभार्थी यादी…

निवडणुकीमुळे मोठे निर्णय

देशभरात लोकसभा निवडणुका झाल्या. निवडणुकीच्या काळामधे आचारसंहिता लागू असल्याने सरकारला याबाबत कोणताही निर्णय घेता आला नाही. दरम्यान, महाराष्ट्रात येत्या पाच ते सहा महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन उर्वरित 75 टक्के पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या या पाऊलाने मोठा दिलासा मिळाला आहे. (Crop Insurance)

हे वाचलंत का? -  शेतकऱ्याचा नाद करायचा नाही; 21 लाखांना खरेदी केला 'किटली' - Marathi News | Pune Khed Taluka Farmer buy Kittle OX, Bull 21 lakhs Desire has no value; The discussion of this farmer , 'Kettle' was bought for 21 lakhs


Web Title – शेतकऱ्यांनो खुशखबर, या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात 75 टक्के पिक विम्याची रक्कम जमा… पात्र शेतकऱ्यांची यादी पहा..

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj