मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

पीएम किसान लाभार्थी यादीतून या शेतकऱ्यांना वगळले.. बघा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ..

PM Kisan Beneficiary Status: रामराम शेतकरी मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना चालवत आहे. लाभार्थी यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, तर लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासणे तुमच्या साठी अत्यंत आवश्यक आहे.

पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत देशातील लाखो शेतकरी आहेत. अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जही केले आहेत. सरकार द्वारे या योजने मार्फत प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधे 2 हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. या प्रधानमंत्री योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षाला 6 हजार रुपयांचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने जून 2024 मध्ये 17 व्या हप्त्याची रक्कम जमा केली होती.

लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहा,

येथे क्लिक करा

ज्याही शेतकऱ्यांची नावे लाभार्थी म्हणून यादीत (PM Kisan Beneficiary Status) आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना आपले नाव लाभार्थी यादीतून वगळले आहे की नाही हे तपासावे लागेल.

हे वाचलंत का? -  अखेर, या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळाली.. जिल्ह्यांच्या याद्या पहा..

कोणत्या आधारावर नाव काढले जाऊ शकते?

अर्जदाराने त्याच्या बँक खात्याची चुकीची माहिती किंवा तपशील दिल्यास आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नसल्यास लाभार्थी यादीतूनही नाव काढून टाकले जाईल. अर्जदाराचे वय हे 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर, तो योजनेंतर्गत लाभ मिळण्यास पात्र असणार नाही. असे शेतकरी ज्यांनी अजूनही केवायसी पूर्ण केलेले नाही त्यांची नावे काढली जातील. तसेच, जर अर्जदार योजनेच्या पात्रता निकषांची पूर्तता करत नसेल तर त्याचे नाव काढून टाकण्यात येईल.

लाभार्थी यादीमधील नाव कसे तपासाल?

प्रधानमंत्री किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला सगळ्यात आधी भेट द्यावी लागेल. त्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर असणारा ‘नो युवर स्टेटस’ हा पर्याय निवडायचा आहे.

अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ₹6000 जमा.. बघा लाभार्थी यादी…

हे वाचलंत का? -  बी-बियाणे चढ्याभावाने विकल्यास जागच्या जागी कारवाई करा, कृषिमंत्री धनजंय मुंडे यांचे अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde warns of immediate action if seeds are sold at high prices

तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकावा लागणार आहे. जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहित नसेल, तर त्याजागी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा सुद्धा टाकू शकणार आहेत.

यानंतर, तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक कळेल. त्यानंतर तुम्हाला “लाभार्थी यादी” वर क्लिक करायचे आहे.

आता तुमची माहिती प्रविष्ट करा जसे की राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव इ. त्यानंतर, “अहवाल मिळवा” हा पर्याय निवडा.

हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, राज्यात मुसळधार पाऊस अन् गारपीट, रब्बी पिकांना फटका - Marathi News | Maharashtra hail and unseasonal rain in Vidarbha and Khandesh marathi news

आता तुमच्या संपूर्ण गावातील लाभार्थ्यांची यादी (PM Kisan Beneficiary Status) तुमच्या समोर ओपन होईल. येथे तुम्ही तुमचे नाव सहज पाहू शकणार आहात.


Web Title – पीएम किसान लाभार्थी यादीतून या शेतकऱ्यांना वगळले.. बघा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ..

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj