mumbai housing news: डिजिटल रिअल इस्टेट ब्रोकर प्रॉपटायगर कॉमच्या तिमाही विश्लेषणानुसार एप्रिल-जूनच्या दुसऱ्या तिमाहीत भारतातील प्रमुख आठ निवासी बाजारपेठांमधील घरांची विक्री 6 टक्क्यांनी कमी झाली आणि मुंबईतील घरांची विक्री 8 टक्क्यांनी घसरली.
रिअल इस्टेट ब्रोकरेज प्लॅटफॉर्म PropTiger हा REA इंडियाचा भाग आहे आणि हाऊसिंग डॉट कॉमच्या मालकीचा आहे. कंपनीने ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल – एप्रिल-जून 2024’ या अहवालात (Mumbai Housing News) तिमाही गृहनिर्माण पुरवठा आणि मागणी डेटा जारी केला आहे. अहवालात मुंबई MMR, पुणे, बेंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली NCR शहरांचा समावेश आहे.
आकडेवारीनुसार, या घरांची विक्री एप्रिल-जूनमध्ये 6 टक्क्यांनी घसरून 1,13,768 युनिट्सवर आली, जी आधीच्या जानेवारी-मार्चच्या पहिल्या तिमाहीत 1,20,642 युनिट्स एवढी होती. तिमाही विक्रीतील ही घट बेंगळुरू (30% वाढ) आणि दिल्ली-NCR (10% वाढ) वगळता देशभरात दिसून आली. दरम्यान, नवीन पुरवठा जानेवारी-मार्च या कालावधीतील 1,03,020 युनिटच्या तुलनेत एप्रिल-जून तिमाहीत 1 टक्क्यांनी घसरून 1,01,677 युनिट्सवर आला आहे.
शेतकऱ्यांनो सावधान! या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा.. पिकांचे मोठे नुकसान..
श्री विकास वधावन, व्यवसाय संचालक, PropTiger.com आणि ग्रुप CFO, REA India, म्हणाले आहेत की, “एप्रिल आणि जूनमधील सार्वत्रिक निवडणुकांमुळे रिअल इस्टेटची (Mumbai Housing News) मागणी माफक राहिली असली तरी, मजबूत मूलभूत गोष्टींमुळे रिअल इस्टेट गुंतवणुकीकडे ग्राहकांकचा कल खूप जास्त आहे.
मुंबई एमएमआर, पुणे येथील घरांच्या विक्रीत घट:
तिमाही आकडेवारीनुसार, मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) घरांची विक्री 41,954 युनिट्सवरून 8 टक्क्यांनी घसरली असून ती आता 38,266 युनिट्सवर आली आहे. दरम्यान, पुण्यातील घरांची विक्री एप्रिल-जून दरम्यान 5 टक्क्यांनी घसरली असून ती आता 21,925 युनिट्सवर आली असल्याचं दिसून येत आहे, जी मागील तीन महिन्यात 23,112 युनिट्स इतकी होती.
काय सांगता? सोयाबीन बाजारभाव तब्बल एवढ्या रुपयांनी वाढला.. बघा आजचा बाजार भाव..
तथापि, बेंगळुरूमधील विक्री 10,381 युनिट्सवरून 30 टक्क्यांनी वाढून 13,495 युनिट्सवर पोहोचली. चेन्नईतील निवासी मालमत्तेची विक्री 4,427 युनिट्सवर होती ती 10 टक्क्यांनी घसरून ती 3,984 इतक्या युनिट्सवर आली आहे. दिल्ली-एनसीआरमधील विक्री ही 10 टक्क्यांने वाढून 10,058 युनिट्सवरून आता 11,065 युनिट्स झाली असल्याचं दिसून येत आहे. हैदराबादमधील मालमत्ता (Mumbai Housing News) विक्री 14,298 युनिट्सवरून 14 टक्क्यांनी घसरली असून ती आता 12,296 युनिट्सवर आली आहे. कोलकातामधील विक्री 3,857 युनिट्सवरून 16 टक्क्यांनी घसरली असून ती आता 3,267 युनिट्सवर आली आहे.
Web Title – मुंबईकरांची बल्ले बल्ले! या भागातील घरांच्या विक्रीत लक्षणीय घट… घरांच्या किमती कमी होणार..