Crop insurance scheme: राज्यात सन 2023 पासून एक रुपयात पीक विमा योजना ही राबवण्यात येत आहे. 1 रुपयात पीक विमा योजना सुरू झाल्यापासून सर्वाधिक शेतकरी पीक विमा (pik Vima) योजनेत सामील झाले आहेत. गतवर्षी अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती आणि भीषण दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता.
पीक विम्याअंतर्गत आतापर्यंत 7,280 कोटी रुपयांचा पीक विमा, पिक कापणी, नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आला आहे. पीक विम्याअंतर्गत (Crop insurance scheme) 4,271 कोटी रुपयांचा पीक विमा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वितरित केला गेला आहे. उर्वरित पीक विम्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.
शेतकर्यांचं कर्ज माफ होणार? ‘या’ शेतकर्यांना मिळू शकते 3 लाखांपर्यंत कर्ज माफी, पहा कामाची बातमी..!
मुंडे म्हणाले की, 3,009 कोटी रुपयांची पीक विमा वितरण योजना सुरू असून अंतिम पीक अहवालानुसार रक्कमेत वाढ करण्यात येईल.
मुंडे म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा मिळाला आहे. पीक विमा (Crop insurance scheme) योजनेला सुरुवात झाल्यापासून सन 2023 मध्ये सर्वाधिक पीक विम्याची रक्कम मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
येथे वाचा – शेतकर्यांनो! सरकारी मदत पाहिजे का? तर मग मोबाईल वरून लगेच करा ‘हे’ एक काम..!
Web Title – शेतकर्यांनो! पीक विमा झाला मंजूर; पहा तुम्हाला मिळणार का?