CM annapurna yojana : अलीकडच्या काळात सरकारने महिलांसाठी खूपच जबरदस्त योजना आणल्या आहेत. या योजनांमुळे राज्यातील महिला बस मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करू शकत आहे, लाकडी बहीण योजनेमुळे महिन्याला 1500 रुपये मिळत असल्याने महिलांच्या आर्थिक अडचणी दूर होत आहे. त्यासोबतच महिलांना मोफत गॅस सिलिंडर देण्यात येत आहे. महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार असून त्यासाठी कुठे अर्ज करावा? याची माहिती इथे जाणून घेऊया..
या महिलांना मिळणार गॅस सिलिंडर
महिलांना मोफत गॅस सिलिंडरचा लाभ मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून मिळत असून या मोफत गॅस सिलिंडरसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील महिला पात्र असणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना वर्षाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. जर तुमच्या घरातील महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
या शेतकर्यांचे कर्ज माफ होणार, येथे क्लिक करून पहा बातमी..
मोफत गॅस सिलिंडरसाठी येथे करा अर्ज
कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम त्यासाठी अर्ज कुठे करावा लागतो याची माहिती आपल्याला असावी लागते. जर तुम्हाला वर्षाला मोफत तीन गॅस सिलिंडर पाहिजे असतील तर तुम्हाला आपल्या भागामधील गॅस वितकरकांकडे अर्ज सादर करावा लागेल. अर्जाची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर येत्या काळात तुम्हाला मोफत गॅस सिलिंडर मिळेल. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्ही या मोफत गॅस सिलिंडर देणार्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करू शकता.
Web Title – महिलांनो! मोफत गॅस सिलिंडर घ्यायचाय का? फक्त इथे करा एक अर्ज..!